राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सर्वांना वाट पाहायला लावणारा मान्सून अखेर कोकणामध्ये दाखल झालाय. शेतकऱ्यांसह संपूर्ण राज्याला सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. आता मान्सूनबाबत माहितीसाठी कृषी विभागानं पुढाकार घेतला आहे.
राज्य सरकारने (महाराष्ट्र शासन) कृषी विभाग, भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातल्या शेतकरी बांधवांना हवामानाच्या अंदाजासंबंधी विशेष मार्गदर्शनासाठी महत्वाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. कृषी विभाग भारतीय हवामान विभाग पु़णे आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याकडून शेतकरी बांधवांना प्रत्येक शुक्रवारी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याविषयीचा कार्यक्रम यू-ट्यूब वर लाईव्ह पाहता येणार आहे.
भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. प्रत्येक शुक्रवारी शेतकऱ्यांना आठवड्याचा हवामानाचा अंदाज देण्यात येणार आहे. तसेच कृषी तज्ज्ञांचा सल्ला देखील देण्यात येणार असल्याचे होसाळीकर यांनी सांगितले. याचा राज्यातील शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होणार असल्याचे होसाळीकर म्हणाले.
पावसाने कुठे लावली हजेरी ?
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याचं दिसलं. राज्यात काही ठिकाणी पालघरमध्ये दाखल झालेल्या मान्सूनचा परिणाम मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, या जिल्ह्यात पाहायला मिळाला. या ठिकाणी पावसाचं जोरदार आगमन झालं. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता शेतकरी कधी समाधानकारक पाऊस होणार, याची वाट पाहत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy