अनेकदा वाहन चालवताना कळत-नकळत चुका होतात.. अशा वेळी तुम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीत सापडला, तर कारवाई होणारच.. मात्र, पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी अनेक जण नियम मोडल्यानंतर तेथून निसटण्याचा प्रयत्न करीत असतात.. तसे होऊ नये, म्हणून ट्रॅफिक पोलिस गाडीची चावी काढून घेतात..
वाहतूक पोलिसांना खरंच असा अधिकार आहे का, ते तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकतात का, याबाबत कायदा काय सांगतो, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या..
कायदा काय सांगतो..?
भारतीय मोटार वाहन कायदा 1932 अंतर्गत, वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास, केवळ ‘एएसआय’ स्तरावरील अधिकाऱ्यांनाच तुमचे चालान कापता येते. ‘एएसआय’, ‘एसआय’, ‘इन्स्पेक्टर’ यांनाच ‘ऑन दी स्पाॅट’ दंड करण्याचा अधिकार आहे. त्यांना मदत करण्यासाठी वाहतूक हवालदार असतात..
तसंच, कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यांना गाडीच्या चाव्या काढण्याचा अधिकार नाही. तसेच, ते गाडीच्या टायरची हवाही काढू शकत नाहीत. तुमच्याशी चुकीच्या पद्धतीने बोलू शकत नाहीत. वाहतूक पोलिस विनाकारण त्रास देत असतील, तर तुम्हालाही त्यांच्यावर कायद्यानुसार तक्रार करण्याचा अधिकार आहे..
या गोष्टी लक्षात ठेवा
– चालान कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक किंवा ई-चलान मशीन असणं आवश्यक. पोलिसांकडे दोन्हीपैकी काहीही नसल्यास चालान कापता येत नाही.
– वाहतूक पोलिसांनी गणवेशात असणे गरजेचं आहे. युनिफॉर्मवर बक्कल नंबर व पोलिसांचे नाव असावे. पोलिस गणवेशात नसल्यास ओळखपत्र विचारू शकता.
– वाहतूक पोलिसांचे हेड कॉन्स्टेबल तुम्हाला फक्त 100 रुपयांपर्यंत दंड करू शकतात. त्यापेक्षा जास्त दंड आकारण्याचा अधिकार फक्त ‘एसआय’ किंवा ‘एसआय’ यांनाच आहे..
– ट्रॅफिक हवालदाराने गाडीची चावी काढल्यास, त्याचा व्हिडीओ बनवा. हा व्हिडीओ त्या भागातील पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्याला दाखवून तक्रार करू शकता.
– वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स, पीयुसी असणं आवश्यक. वाहन नोंदणी व विम्याची झेरॉक्स प्रतही चालू शकते.
– दंड भरण्यासाठी पैसे नसल्यास नंतर दंड भरता येतो. अशा वेळी न्यायालय चालान जारी करते, ते न्यायालयात जाऊन भरावे लागते. या काळात वाहतूक अधिकारी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे ठेवून घेऊ शकतात.