‘पीएफ’ खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे.. देशातील तब्बल 7 कोटी नाेकरदार वर्गासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, या नोकरदारांच्या ‘ईपीएफओ’ (EPFO) खात्यावर 2021-22 या आर्थिक वर्षातील व्याजाची रक्कम केंद्र सरकार लवकरच जमा करणार आहे.
गेल्या वर्षी व्याजाची रक्कम मिळण्यासाठी ‘पीएफ’ (PF) खातेदारकांना 6 ते 8 महिने वाट पाहावी लागली होती. पण, यंदा केंद्र सरकारने व्याजाची रक्कम लवकरच जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येत्या 16 जूनपर्यंत नोकरदारांच्या ‘पीएफ’ खात्यावर व्याजाची रक्कम जमा होणार असल्याचे सांगण्यात आले..
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना.. अर्थात ‘ईपीएफओ’नं 2021-22 या आर्थिक वर्षासाठी ‘पीएफ’वरील रकमेवर 8.1 टक्के व्याज देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी काहीसी नाराजीही व्यक्त केली होती. कारण, सरकारने जाहीर केलेला हा व्याजदर मागील 40 वर्षात सर्वात कमी असल्याचे दिसते..
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी व्याजाच्या रकमेची मोजणी केलीय. जवळपास 72 हजार कोटी रुपये देशातील 7 कोटी नोकरदार वर्गाच्या खात्यावर जमा होणार आहेत. गतवर्षी 2020-21 मध्ये केंद्र सरकारने 8.50 टक्के व्याजदराने 70 हजार कोटी रुपये व्याज पीएफ खात्यावर जमा केले होते.
असा चेक करा बॅलन्स..
- पीएफ खात्यावरील बॅलेन्स चेक करण्यासाठी ‘ईपीएफओ’च्या अधिकृत संकेतस्थाळाला epfindia.gov.in भेट द्या.
- संकेतस्थळावर गेल्यानंतर ई-पासबुकवर क्लिक करा..
- नंतर तिथे तुम्ही तुमचा UAN नंबर, पासवर्ड व कॅप्चा आदीची माहिती भरा.
- सगळी माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुमच्यासमोर पीएफ खात्याची माहिती मिळेल..
दरम्यान, यंदा पीएफ खात्यावरील व्याजाची रक्कम केंद्र सरकारकडून लवकर मिळत असल्याने नोकरदार वर्गाला माेठा दिलासा मिळाला आहे..