SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कुठं आग, कुठं धुकं, कुठं पाऊस, ‘हे’ सर्व कळणार एका क्लिक वर ; गुगल मॅप्स मधील ‘हे’ तीन बदल नक्की वाचा

मोबाईल फोनच्या माध्यमातून आजकाल सगळ्या गोष्टी करणे अगदी सोपं झालं आहे. त्यातचं आता सर्वात मोठं सर्च इंजिन गुगल आपल्या काही फीचर्समध्ये बदल करणार आहे. गुगलकडून गुगल मॅप्समध्ये(Google Maps) काही नवीन बदल करण्यात येणार आहेत. गुगल मॅप्समुळे आपल्याला कोणताही पत्ता सापडण्यास मदत होते. आपण जंगलात असू किंवा जमिनीवर, आपण कुठूनही गुगल मॅप्सचा वापर करू शकतो. आता हेच गुगल मॅप आपल्याला शुद्ध हवा देण्याचं काम करणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या भागात राहत असाल किंवा कुठं प्रवास करत असाल तर गुगल मॅप्स त्या भागातील Air Quality म्हणजेच हवा किती शुद्ध आहे ? हे सांगण्याचं काम करणार आहे.

यासोबत गुगल मॅप्स ढगाळ वातावरण, धुक्याचे वातावरण यांसारख्या हवामनपूरक गोष्टींची माहिती देखील वापरकर्त्याला देणार आहे. सध्या मोबाईलवर हवामानचा अंदाज बघण्यासाठी आपल्याला काही थर्ड पार्टी ऍप्सचा वापर करावा लागतो. मात्र गुगल मॅप्सच्या येणाऱ्या नवीन फीचर्समध्ये हे सर्व एकाच छताखाली आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Advertisement

अमेरिका हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत पुढे आहे. अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच गुगलने अशीच संकल्पना वापरलेली आहे. जंगलात वारंवार लागणाऱ्या आगीवर उपाय म्हणून गुगलने ऍक्टिव्ह फायर हे खास फिचर वापरात आणले आहे. या फीचरचा उपयोग करून लगेचच जंगलाच्या कोणत्या भागात आग लागली आहे हे कळण्यास मदत होत आहे. Wildfires Near Me असं सर्च केल्यानंतर लगेचच ज्या भागात आग लागली आहे ते ठिकाण दर्शवण्याचं काम गुगलद्वारे करण्यात येत आहे. अमेरिकेत Air Qualityची माहिती देखील गुगल मॅप्सवर आता मिळत आहे.

Advertisement