SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

एका चार्जमध्ये 110 किमी धावणारी Electric Bike; सरकार देतेय 40,000 रुपयांची सबसिडी

मुंबई :

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2022 मध्ये अधिक इलेक्ट्रिक वाहने लाँच करण्यात आली आणि विकलीही जात आहेत. याचे कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांवर राज्य सरकारकडून सबसिडी दिली जात आहे. उत्तम बॅटरी बॅकअप आणि नवीन फिचर्ससह, ग्राहक आकर्षित होत आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रिक बाईक किंवा स्कुटर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Advertisement

स्विच मोटोकॉर्प या देशातील नवीन ईव्ही स्टार्टअप कंपनीने नवीन इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्याची तयारी केली आहे. कंपनीची पहिली ई-बाइक सीएसआर 762 (CSR 762) लवकरच लाँच होऊ शकते. या बाईकची किंमत कंपनीने अद्याप जाहीर केलेली नाही. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही बाईक 1.62 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे या बाइकला केंद्र सरकारच्या फेम-2 योजनेअंतर्गत 40 हजार रुपयांची सबसिडी मिळू शकते.

या बाईकचा दमदार आणि शानदार लूक पाहून प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडू शकतो. अजून एक भारी गोष्ट म्हणजे ही बाईक जेवढी स्पोर्टी दिसते तेवढीच ती आक्रमकही वाटते. कारण ही बाईक आणि तिचा लुक गुजरातच्या एशियाटिक लायनपासून प्रेरित आहे. कंपनीकडून 3.7 kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे ही बाईक चालेल. विशेषतः, बाईक संपल्यावर, ती चार्ज होईपर्यंत तुम्हाला थांबावे लागणार नाही. वापरकर्ते स्वॅपिंग स्टेशनवर जाऊन या बाइकची बॅटरी बदलू शकतात.

Advertisement