SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँकांचा पुन्हा संप? किती दिवस बँका राहणार बंद, घ्या जाणून..

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शनशी संबंधित समस्या आणि आठवड्यातून पाच दिवस कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी येत्या 27 जूनला संपावर जाण्याची इशारा दिला आहे. पाच दिवसांचा आठवडा आणि पेन्शन संबंधिच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या नाहीत, तर कर्मचारी 27 जून 2022 ला संप पुकारतील, अशी भूमिका बँकांच्या युनियननं घेतली आहे.

माहीतीनुसार, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (UFBU) या संपाचे नेतृत्व करत आहे. युनायडेट फोरम ऑफ बँक युनियनमध्ये (UFBU) देशातील एकूण 9 बँक युनियन्स समाविष्ट आहेत. यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (NOBW) संपावर जाणार आहेत.

Advertisement

एआयबीओसीचे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला माहीती देताना सांगितलं की, “जर सरकार आणि बँकांचे मॅनेजमेंट संघटनांच्या सध्याच्या मागण्यांबाबत असंवेदनशील असेल तर भारतातील सुमारे 7 लाख कामगार संपात सहभागी होतील. यामुळे बँक कर्मचारी संपावर गेले की, बँकिंग कामकाजावर आणि व्यवहारांवर परिणाम होणे निश्चित आहे”, असं इशारा देत त्यांनी सांगितलंय.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अनेक दिवसांपासून बँकांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी करत आहे. दर आठवड्यात फक्त पाच दिवसांचं काम असावं अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी आहे. हा नियम देशातील प्रायव्हेट सेक्टरमधील बऱ्याच बँकांना सध्या लागू आहे.

Advertisement

बँक कर्मचाऱ्यांनी संप केला तर…

जर बँक कर्मचारी 27 जून रोजी संप करत असतील तर 3 दिवस बँका बंद राहणार असल्याने तुमची गैरसोय होऊ शकते. कारण बँक कर्मचारी जरी 27 जूनला संपावर गेले तरी त्यापूर्वी 25 जूनला महिन्यातील चौथा शनिवार असल्याने सुटी येतेय आणि लगेच 26 जूनला चौथा रविवार असल्याने रविवारची जून रोजी कर्मचाऱ्यांनी संप केल्यास सलग तीन दिवस बँकांचं कामकाज बंद राहील. त्यामुळे तुमचं काही बँकेचं महत्वाचं काम असेल तर या 3 दिवसांपूर्वी ती उरकून घ्यावीत. अन्यथा तुमचे व्यवहार खोळंबू शकतात.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement