SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, ‘या’ नावांची जोरदार चर्चा…!

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. त्याआधी देशाच्या 15 व्या राष्ट्रपतींची निवड केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (ता. 9) राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला..

देशाला लवकरच नवे राष्ट्रपती (President of India) मिळणार आहेत. येत्या 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. त्यासाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, येत्या 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

Advertisement

निवडणूक कार्यक्रम असा

 • 15 जून – निवडणूक अधिसूचना जारी होणार
 • 29 जून – उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख
 • 2 जुलै – अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
 • 18 जुलै – मतदान
 • 21 जुलै – निकाल
 • 24 जुलै – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ

हेही महत्वाचे वाचा

Advertisement
 • निवडणूक आयोग मतदानासाठी मतदारांना पेन देणार
 • 5,43200 इतके यंदाच्या मतांचे मूल्य
 • 4809 मतदार मतदानाचा हक्क बजावणार
 • 776 खासदार, 4033 आमदार मतदान करणार
 • संसद आणि विधानसभांमध्ये मतदान प्रक्रिया
 • 10 दिवस आधी सूचना केल्यावर हव्या त्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार
 • राजकीय पक्षांना मतदारांना ‘व्हीप’ लागू करता येणार नाही.

दरम्यान, गेल्या 45 वर्षांपासून याच पद्धतीने राष्ट्रपतींची निवड होते आहे. 17 जुलै 2017 रोजी याआधीची राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक झाली होती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा व राज्यसभेतील सदस्य मतदान करतात.

‘या’ नावांची चर्चा
राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत सध्या 5 नावांची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, त्यात 4 महिला असल्याने, पुढील राष्ट्रपती या महिला असू शकतात. चर्चेत असणारी नावे खालीलप्रमाणे :

Advertisement
 • माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन
 • उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल
 • छत्तीसगडच्या राज्यपाल अनसूया उईके
 • तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन
 • झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू

मतदान अधिकाराबाबत..
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत काही सदस्यांना मतदान करता येत नाही.. त्यात राज्यपाल नियुक्त सदस्य, विधान परिषद सदस्य, तसेच मुख्यमंत्री जर विधान परिषदेचा सदस्य असल्यास मतदान करता येत नाही. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर झाल्याने देश पातळीवरील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement