SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘आरटीओ’ कार्यालयाच्या चकरा थांबणार, परिवहन विभागाकडून ‘ही’ खास सेवा सुरु…!!

वाहनाबाबत किंवा लायसन्स काढण्यासाठी पूर्वी ‘आरटीओ’ (RTO) कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत. त्यामुळे अनेक जण ‘आरटीओ’त जायचं म्हटलं, तरी कानाला हात लावत. मात्र, आता नो टेन्शन.. कारण, आता ‘आरटीओ’त न जाता, अगदी घरबसल्या ही सगळी कामे करता येणार आहेत.

राज्याच्या परिवहन विभागाने काही दिवसांपूर्वी ‘फेसलेस सेवे’चा (Faceless) प्रारंभ केला. त्यामुळे वाहनाची, तसेच लायसन्ससंबंधीत एकूण 6 कामे घरबसल्या ‘फेसलेस’ होणार आहेत. 1 जूनपासून या सेवेचा प्रारंभ झाला.. त्यामुळे आता ‘आरटीओ’ कार्यालयात जाण्याची गरज नाही.. त्यात नेमक्या कोणत्या कामांचा समावेश आहे, हे जाणून घेऊ या..

Advertisement

फेसलेस सेवा..

  • वाहनांबाबतच्या सेवा : वाहन कागदपत्रांवरील पत्ता बदल, डुप्लिकेट आरसी बुक, स्थानांतर एनओसी.
  • लायन्ससबाबत सेवा : पत्ता बदल, लायसन्स रिन्यूव्हल, डुप्लिकेट लायसन्स

18 सेवा ‘फेसलेस’ मिळणार..
परिवहन विभागाकडून तब्बल 115 सेवा दिल्या जातात. पैकी 84 सेवा ऑनलाईन (Online) झाल्या आहेत. त्यात ऑनलाइन अर्ज, ऑनलाइन पेमेंट व कागदपत्रे अपलोड करता येतात.. आतापर्यंत या सेवा ऑनलाइनच होत्या, मात्र एकदा तरी ‘डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन’साठी ‘आरटीओ’ कार्यालयात जावे लागत असे. मात्र, आता त्यासाठी ‘आरटीओ’त जाण्याची गरज नाही.

Advertisement

केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार 18 सेवा ‘फेसलेस’ पद्धतीने दिल्या जाणार आहेत. आधार क्रमांकाचा वापर करुन या सेवा घरबसल्या मिळतील. आतापर्यंत लर्निंग लायसन्स (learning licence) व वितरकांमार्फत नोंदणीच्या सेवा मिळत होत्या. आता त्यात आणखी 6 सेवांची भर पडलीय. लवकरच इतर सेवांचाही त्यात समावेश होणार असल्याचे सांगण्यात आले.

फेसलेस सेवेमुळे नागरिकांना ‘आरटीओ’ कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागणार नाही. तसेच, कोणत्याही कामासाठी एजंटला पैसे द्यावे लागणार नाही. ‘आरटीओ’ कार्यालयातील नागरिकांची गर्दीही कमी होणार आहे. अँड्रॉईड मोबाईल किंवा संगणकाद्वारे ही सगळी कामे घरबसल्या करता येणार आहेत.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement