मुंबई :
रशिया-युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यातील युद्ध सुरु होऊन 100 हून अधिक दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही युद्ध सुरुच आहे. याच युद्धाचा परिणाम जागतिक आणि भारतीय बाजारपेठेवर होताना दिसतोय. सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना पाहायला मिळत आहे. सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ (Gold Silver Price Increased today) झाली.
सराफा बाजारात, 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,000 रुपयांच्या आसपास आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर (Gold Rate Today) 98 रुपयांनी वाढून 51,136 रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा भाव (Gold Rate Today) 62,048 रुपयांवर उघडला. IBJA च्या वेबसाइटवर सोन्याची ही किंमत आहे.
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 47,896 | 63,480 |
पुणे | 47,896 | 63,480 |
नाशिक | 47,896 | 63,480 |
नागपूर | 47,896 | 63,480 |
दिल्ली | 47,813 | 63,370 |
कोलकाता | 47,832 | 63,400 |
कशी तपासाल सोन्याची शुद्धता :-
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.