क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी आहे.. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या 5 टी-20 मॅचच्या सीरिजला आजपासून (ता. 9) सुरूवात झाली. मात्र, मालिकेला सुरुवात होण्याआधीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. या संघात कोराेनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली..
दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन् मार्करम याला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे आफ्रिका संघाने ‘प्लेईंग-11’मधून त्याला वगळलं आहे.. आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमाने टॉसच्या वेळी ही माहिती दिली.. एडन् मार्करमला कोरोनाची लागण झाल्याने पहिल्या टी-20 सामन्यातून त्याला बाहेर बसवण्यात आल्याचे बऊमाने सांगितले…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 5 सामन्यांची टी-20 मालिका होत आहे. त्यातील पहिला सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. मात्र, पहिल्या सामन्यापूर्वीच आफ्रिका संघातील खेळाडूला कोरोनाची बाधा झाल्यामुळे चिंता वाढली आहे. तसेच, या मालिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत..
दिल्लीत कोरोना वाढतोय..
गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. त्यात गेल्या तीन दिवसांपासून दोन्ही संघ दिल्लीत आहेत. कोरोनामुळे गेली 2 वर्षे टीम इंडियाच्या सगळ्या मालिका, तसेच ‘आयपीएल’ स्पर्धाही ‘बायो-बबल’मध्ये खेळवली गेली होती, मात्र या मालिकेसाठी ‘बीसीसीआय’ने ‘बायो बबल’ हटवण्याचा निर्णय घेतला होता..
‘बायो-बबल’ नसल्याने खेळाडूंना थोडा दिलासा मिळाला. या मालिकेसाठी ‘बायो-बबल’ नसले, तरी खेळाडूंना जास्त गर्दीच्या ठिकाणी जाण्याची, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही. असे असतानाही पहिल्या सामन्याआधीच खेळाडूला कोरोना झाल्यामुळे ‘बायो बबल’ हटवण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, अशी चर्चा सुरु झालीय.
दरम्यान, आफ्रिकेचा कर्णधार बावुमाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. मात्र, भारतीय संघाने जोरदार सुरुवात केली. सलामीवीर ईशान किशनने (76) शानदार अर्धशतक झळकावले.. ऋतुराज गायकवाड 23 धावा करुन बाद झाला. भारतीय संघाने 13 व्या षटकात 2 विकेट गमावून 137 धावा केल्या होत्या..