SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईल सेटिंग्जमध्ये करा ‘हे’ बदल, क्षणात वाढेल ‘इंटरनेट स्पीड’..!!

कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये वापरले जाणारे पॉवरफुल प्रोसेसर, रॅमचा उपयोग स्मार्टफोनमध्ये केलेला असतो. त्यामुळे सध्याचे स्मार्टफोन्स अतिशय फास्ट काम करतात. मात्र, काही दिवसांनंतर फोन स्लो झाल्याची किंवा तो वारंवार हँग होत असल्याची तक्रार केली जाते..

कधी कधी एखादं महत्वाचं काम करताना, मध्येच नेट डाऊन होतं नि सगळं गणितच बिघडतं. मात्र, ‘नो टेन्शन’.. त्यावरही तोडगा आहे. मोबाईल इंटरनेटचा स्पीड (Internet Speed) वाढवण्यासाठी तुम्हाला फक्त काही टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. त्या खालीलप्रमाणे :

Advertisement

असा वाढवा ‘इंटरनेट स्पीड’..
– बऱ्याचदा कॅचे (Cache) फुल झाल्यानंतर अँड्रॉईड फोन स्लो होण्यास सुरुवात होते. त्याचा थेट परिणाम इंटरनेट स्पीडवर होतो. त्यामुळे वेळोवेळी कॅचे (Cache) साफ करायला विसरु नका.
– फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन तिथं नेटवर्क सेटिंगमध्ये ‘प्रेफर्ड नेटवर्क टाईप 4 जी’ किंवा ‘एलटीई’ आहे की नाही, हे पाहा. नसल्यास उपलब्ध पर्याय निवडा.

– फोन रिस्टार्ट केला, तरी लगेच मोबाईल नेट चांगलं काम करु लागतं. फोन पुन्हा सुरु केल्यामुळं तो नव्यानं इंटरनेट शोधतो नि त्यामुळं डेटा स्पीडही वाढतो.
– मोबाईलमधील ‘ऑटो डाऊनलोड’ हे फिचर सतत ‘डिसेबल’ ठेवा. त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणतीही गोष्ट डाऊनलोड होणार नाही व इंटरनेट वाया जाणार नाही.

Advertisement

– फोनचं इंटर्नल स्टोअरेज कधीही दोन तृतीयांशपेक्षा अधिक भरु देऊ नका. फोनमध्ये अनेक अ‍ॅप्स (Apps) विनाकारण असतात. अनेकदा त्याचा वापरही केला जात नाही. मात्र, ते बॅकग्राउंडवर सुरू राहतात..
– स्मार्टफोनवर येणारे अपडेट्स वेळोवेळी पूर्ण करा. कारण, त्यात काही वेळा ‘बग पॅचेस’ असतात, जे स्मार्टफोनमधील चुकीचा प्रोग्राम दुरुस्त करतात.

– या टिप्स फाॅलो करा, मग बघा तुमच्या मोबाईल इंटरनेटचा स्पीड कसा धावतो ते.. पण हे सगळं करुनही फोनचा स्पीड वाढत नसेल, तर ‘फोन फॅक्टरी रिसेट’ (Factory Reset) करण्याचाही पर्याय असतो. मात्र, ‘डेटा बॅकअप’ घेतल्यानंतरच फोन रिसेट करा.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement