SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बारावीनंतर काय कराल..? ‘या’ क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी…!

बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. 8) जाहीर झाला. विद्यार्थी-पालकांचे लक्ष आता पुढील शिक्षणाकडे लागले असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांचे ध्येय ठरलेले असते. मात्र, अनेकांना नेमकं कोणत्या क्षेत्रात करियर करावं, हे लक्षात येत नाही.. बारावीनंतर कोणत्या क्षेत्रात करियरच्या उत्तम संधी आहेत, हे जाणून घेऊ या..

बारावी सायन्सनंतर..
बी.एससी.(B.Sc) – विज्ञान शाखेचे विद्यार्थी आवडता विषय घेऊन बी.एससी. करू शकतात. त्यानंतर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी (M.Sc) करता येते. पुढे पी.एचडी. एम.फील, सेट-नेट केल्यानंतर प्रोफेसर होण्याची संधी असते.

Advertisement

अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) – रसायनशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र या विषयांसह बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकीतही करियर करु शकतात. ‘आयआयटी’ आणि ‘जेईई’ परीक्षेची तयारी करू शकतात. इंजिनिअरिंग करायचे नसल्यास, हॉटेल मॅनेजमेंट कोर्सचाही चांगला पर्याय आहे..

एनडीए – सैन्य दलात जाण्याचा विचार असेल, तर तुम्ही आर्मी, इंडियन नेव्ही, एअर फोर्स पैकी कोणताही एक विभाग निवडून सरकारी नोकरी मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही आधी ‘एनडीए’ची तयारी करू शकता.

Advertisement

बारावी कॉमर्सनंतर..
वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेली मुले पदवीमध्ये बी.कॉम. करू शकतात. त्यानंतर बँकेत अकाउंटिंगची संधी मिळू शकते. BBA, BCA, BMS असे कोर्सही करता येतील.

बारावी आर्ट्सनंतर..
कला शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात सरकारी नोकऱ्यांनाही वाव आहे. तुम्ही नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरु करु शकता.. वकील किंवा मार्केटिंगसाठी ‘एमबीए’ करू शकता.

Advertisement

मास कम्युनिकेशन
बारावीनंतर डिप्लोमा, व्होकेशनल कोर्स, प्रोफेशनल कोर्स करता येतात. त्यात पत्रकार होण्यासाठी ‘मास कम्युनिकेशन’ करता येते. माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.. पत्रकारिता, वृत्तवाहिनीमध्ये नोकरी मिळू शकते. त्यात व्हिडिओग्राफर, अँकर, रिपोर्टर बनू शकता.

टुरिझम कोर्स
प्रवासाची आवड असेल, नवनवीन ठिकाणांबद्दल जाणून घेण्याची इच्छा असल्यास, तुम्ही पर्यटनाचा कोर्स करू शकता. त्यासाठी पर्यटनाचा खास अभ्यासक्रम तयार केला आहे. या कोर्समध्ये तुम्हाला पर्यटनाचा आनंद घेता येईल, सोबत भरपूर पैसेही कमवू शकता. स्वतःची ‘ट्रॅव्हल एजन्सी’ही सुरु करता येईल..

Advertisement

हॉटेल व्यवस्थापन
स्वयंपाकाची आवड असल्यास ‘हॉटेल मॅनेजमेंट’ खूप फायदेशीर ठरु शकतो. अनेक कॉलेजमध्ये ‘हॉटेल मॅनेजमेंट’ कोर्स सुरु झालेले आहेत. तुम्ही एक चांगले शेफ बनू शकता. परदेशात जाऊनही शेफची नोकरी करू शकता. त्यातून चांगली कमाईही होते.

भाषा अभ्यासक्रम
नवनवीन भाषा शिकण्याची, बोलण्याची खूप आवड असेल, तर भाषा अभ्यासक्रम निवडता येईल. या कोर्समधून तुम्हाला नवीन भाषा शिकायला मिळेल. परदेशात नोकरीची संधी मिळेल. सरकारी नोकरीसाठीही अर्ज करू शकता. टूरिझम गाईडलाईनमधील भाषा कोर्स करून चांगले पैसे कमवू शकता.

Advertisement

इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स
पार्टीची आवड असेल, आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल, तर ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कोर्स करून चांगले पैसे कमावू शकता. त्यात परदेशात जाण्याचीही संधी मिळेल आणि चांगली नोकरी मिळू शकते.

अॅनिमेशन कोर्स-
आजकाल कार्टून फिल्म्स बनतात, त्यात अॅनिमेशनचा वापर केला जातो.अॅनिमेशन कोर्स करून तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement