SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Jio ची जबरा ऑफर: फक्त 26 रुपयांमध्ये 28 दिवस इंटरनेट

मुंबई :

कायम मार्केटमध्ये या ना त्या कारणाने चर्चेत राहणे आणि ग्राहकांना आकर्षित करणे, हे जिओचे काम लौंच झाल्यापासून सुरु आहे. मार्केटमध्ये वेगवेगळ्या स्कीम्स व ऑफर घेऊन जिओ आपल्या ग्राहकांना कायमस्वरूपी जोडून ठेवते तसेच नवीन ग्राहकांनाही आकर्षित करते. आताही जिओ अशीच एक धमाकेदार ऑफर घेऊन आले आहे. जिओने एका स्वस्तात मस्त आणि जबरदस्त असा प्लान आणला आहे. जर आपणही जिओचे युजर्स असाल तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

Advertisement

आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका प्‍लॅनबद्दल माहिती देणार आहोत, ज्याची किंमत केवळ 26 रुपये आहे आणि त्‍याच्‍यामुळे अनेक फायदेही मिळतात. 26 रुपयांचा Jio रिचार्ज 28 दिवसांच्या संपूर्ण वैधतेसह आणि 2GB डेटासह येतो. तथापि, केवळ JioPhone युजर्स या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

जिओ कंपनीने हा प्लान स्पेशल आपल्या कंपनीच्या फोन वापरणाऱ्यांकरता बनवलेल्या आहे. JioPhone अॅड ऑन रिचार्ज प्लॅनच्या यादीत समाविष्ट केला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना वैधता आणि डेटासह एसएमएस किंवा कॉलची सेवा दिली जाणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्ते जिओच्या साइटवर किंवा माझ्या जिओ अॅपवरून रिचार्ज करू शकतात.

Advertisement