SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 14 पिकांच्या हमीभावात घसघशीत वाढ..!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी बुधवारी (ता. 9) सर्वात मोठा निर्णय घेतला.. त्यानुसार, तब्बल 14 पिकांच्या हमीभावात केंद्र सरकारने घसघशीत वाढ केली आहे..

यंदाच्या खरीप हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) ठरवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी (ता. 9) बैठक झाली. त्यात 14 पिकांसाठी ‘एमएसपी’ (MSP) वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली..

Advertisement

मोदी सरकारने सलग तिसऱ्या वर्षी खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) मोठ्या प्रमाणात वाढ केलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 खरीप पिकांच्या 17 वाणांच्या नवीन ‘एमएसपी’ला मंजुरी देण्यात आली. ती खालीलप्रमाणे :

Advertisement

कोणत्या पिकाला किती एमएसपी..?

पीक एमएसपी
2021-22
(रु. मध्ये)
एमएसपी
2022-23
(रु. मध्ये)
एमएसपी
किती वाढला
(रु. मध्ये)
भात (सामान्य) 1940 2040 100
भात (ए ग्रेड) 1960 2060 100
ज्वारी (हायब्रीड) 2738 2970 232
ज्वारी (मालदांडी) 2758 2990 232
बाजरी 2250 2350 100
नाचणी 3377 3578 201
मक्का 1870 1962 92
तूर 6300 6600 300
मूग 7275 7755 480
उडीद 6300 6600 300
शेंगदाणे 5550 5850 300
सूर्यफूल 6015 6400 385
सोयाबीन 3950 4300 350
तीळ 7307 7830 523
रामतिल किंवा ​​​​​​​कऱ्हाळे 6930 7287 357
कापूस (मध्यम स्टेपल) 5726 6080 354
कापूस (लांब स्टेपल) 6025 6379 354

 

Advertisement

‘एमएसपी’ म्हणजे काय..?
‘एमएसपी’ म्हणजे किमान आधारभूत किंमत.. शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारी किमान किंमत.. बाजारात पिकाचा भाव कोसळला, तरी भावातील चढ-उतारांचा शेतकऱ्यांवर परिणाम होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना ही कमीत कमी किंमत मिळते. कृषी खर्च व किंमती आयोगाच्या शिफारसीनुसार प्रत्येक हंगामापूर्वी सरकार पिकांचा ‘एमएसपी’ निश्चित करीत असते.

एखाद्या हंगामात ठराविक पिकाचे बंपर उत्पादन झाले, तर बाजारभाव कोसळण्याची शक्यता असते. अशा वेळी ‘एमएसपी’ त्या पिकाची निश्चित खात्रीशीर किंमत असते. शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘एमएसपी’ हे विमा पॉलिसीसारखे कार्य करते.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement