SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अरे वा! आता उन्हात चार्ज होणार स्मार्टफोन; ‘हे’ डिव्हाईस येईल कामी

फोन चार्जिंग करने हे अतिशय महत्वाचे काम आहे. दिवस सुरू झाल्यानंतर सर्वात महत्वाचे काम म्हणजे मोबाईलला चार्जिंग करने होय. पण यासाठी हवी असते, ती लाईट. आता पावसाळा सुरू होतोय. नेहमीच लाईटच जाणं येणं सुरू असते. अनेक वेळेस अनियमित वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे मोबाईल चार्जिंग व्हायचं अनेकदा राहून जातो. आपल्याकडे इन्व्हर्टर असेल तर ही समस्या सुटते. पण सगळ्यांकडेच ही इन्व्हर्टरची सोय असेलच असे नाही. एकावेळी इन्व्हर्टरवर पैसे खर्च करणे देखील परवडत नाही. यावर बाजारात एक नवीन उपाय आलाय तो म्हणजे सोलर पावर बँक.

 

 

Advertisement
आता या सोलर पॉवर बँकच्या माध्यमातून आपला मोबाईल  आरामात चार्ज होणार आहे. पण त्यासाठी आपल्याला गरज असेल उन्हाची आणि एका सोलर पॉवर डिव्हाईसची. ही डिव्हाईस आपल्याकडे असेल तर मोबाईल थेट उन्हाने चार्ज होईल. याने आपण फक्त फोनच नाही तर इतरही डिव्हाइसेस चार्ज करू शकतो. सोलर पॉवर बँकमुळे आपण फोन चार्ज करू शकतो. बाजारात असे काही पॉवर बँक्स उपलब्ध आहेत जे सौरऊर्जेवर चार्ज होतात. हे सोलर बँक आपण कोणत्याही इकॉमर्स प्लॅटफॉर्मवरून  विकत घेऊ शकतो.

 

 

Advertisement
बाजारात स्वस्त ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. पण मात्र त्यांच्या क्वालिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. जर आपण चांगल्या क्वालिटीची सोलर पावर बँक घेण्याचा विचार करत असाल तर त्यांची किंमत साधारण 5500 रुपये असते. या पॉवर बँकची साधारण क्षमता ही 20 हजार mAh असते.

 

बऱ्याच कंपन्या त्यांची पॉवर बँक ही वॉटरप्रूफ असल्याचा दावा करतात. याच्या मदतीने आपण मोबाईल स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्ट वॉच चार्ज करू शकतो. पॉवर बँकांची क्षमता 20 हजार mAh असल्यास आपण 5 हजार mAh चा स्मार्टफोन साधारणतः चारदा चार्ज करू शकतो.
Advertisement