मुंबई :
स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या जगात आज-काल रोजच नवनवीन फीचर्स व कॉलिटी येत असतात. आयफोन हा त्यातील एक वेल फीचर असलेला स्मार्ट फोन आहे. परंतु आता ह्या आयफोनला तोडीस तोड असा नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार असून त्याचे नाव nothing phone 1 असे आहे.
nothing phone 1 हा आयफोन इतकाच हायटेक असणार आहे. हा फोन लॉन्च होण्या अगोदरच यातील काही स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत. या फोन मध्ये 6.55 इंच ओलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर हँडसेट हा विना चीन फ्लॅट पॅनल सपोर्ट शकतो. या nothing phone 1 ला वायरलेस चार्जिंग असेल. त्याशिवाय या फोनचा बॅक हा ट्रान्सपरंट असणार आहे.
या फोनमध्ये क्वालकाम स्नॅप ड्रॅगन चीप बसवण्यात आली आहे. नथिंग ओएस वर हा फोन काम करणार आहे. आठ जीबी रॅम सोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरीज या फोन मध्ये दिले आहे. बॅकअप साठी 4500 एम ए एच बॅटरी उपलब्ध असणार आहे. नुकताच वायरल झालेल्या फोटो नुसार या फोन साठी वायरलेस चार्जिंग उपलब्ध असणार आहे.
कंपनीने नथिंग फोन वन लवकरच लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फोन ग्राहकांना फ्लिपकार्ट या इंटरनेट शॉपिंग सेंटरमध्ये उपलब्ध होणार आहे. नथिंग फोन वन ची किंमत सुमारे 41,400 (भारतीय चलनानुसार) इतकी असण्याची शक्यता वर्तवण्यात आहे येत आहे. कंपनीने गेल्या वर्षी नथिंग वन बड्स लॉन्च केले त्यासाठी देखील त्य फ्लिपकार्ट या ईकॉमर्स कंपनीसोबत करार केला होता.