SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नोकरी करणाऱ्यांना मिळणार 1,55,000 रुपये? ‘त्या’ व्हायरल मेसेजमध्ये काय, घ्या जाणून..

जर तुम्हीही नोकरी करत असाल, तर नोकरी करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. देशातील कामगार मंत्रालय (Ministry of Labour and Employment) नोकरी करणाऱ्यांना 1,55,000 रुपयांचा लाभ देत आहे असा मेसेज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

देशातील कामगार मंत्रालयाने लोकांना या मेसेजमुळे महत्वाची माहीती दिली आहे. कारण या मेसेजद्वारे नोकरी करणाऱ्यांना लाखो रुपये मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. पण आता प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) याबाबतची माहिती देत PIB Fact Check ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करून लोकांना याबाबत अलर्ट राहण्यास सांगितले आहे.

Advertisement

पीआयबीने एका ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे ज्यात दावा करण्यात आलाय की, 1990-2021 दरम्यान काम करणाऱ्या कामगारांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून 1,55,000 रुपयांचा लाभ दिला जात आहे.”, असा मेसेज व्हायरल होत असल्याचं सांगितलं आहे.

तसेच पुढे म्हटलंय की, “हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. असा कोणताही मेसेज कामगार मंत्रालयाने पाठवलेला नाही. कृपया असे खोटे व्हिडीओ कोणालाही शेअर करू नका. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा मेसेजपासून प्रत्येकाने सावध राहावे”, असे पीआयबीने म्हटले आहे. तथ्य तपासणीनंतर पीआयबीने हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं आहे. PIB ने लोकांना असे काही मेसेज लोकांना फॉरवर्ड न करण्यास सांगितलं आहे.

Advertisement

महत्वाचं : आताच्या घडीला किंवा भविष्यात जर तुम्हाला काही व्हायरल मेसेज आले तर आधी सरकारच्या PIB द्वारे तथ्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement