SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. भागीदाराशी मतभेद संभवतात. सहकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. तब्येत सांभाळा. शब्द, पैसा आणि वेळ यांचे नियोजन फायद्याचे ठरेल. अनुकूल घटना घडतील. अपेक्षित पत्रव्यवहार होईल. महत्त्वाचे निरोप येतील. ज्या संधीची वाट पाहत होतात, ती मिळण्याची शक्यता आहे. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल.

वृषभ (Taurus): उतावीळपणे कामे करणे टाळावे. खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. शांत व संयमी विचार करावा. जाणत्यांचा सल्ला हिताचा आहे. चर्चेने प्रश्न सोडवू शकाल. शब्द जपून वापरा. अनेकांचे सहकार्य मिळेल, आर्थिक आवक चांगली राहिल. मात्र, देण्याघेण्याचे व्यवहार जपून करा. थोडी दगदग होईल, प्रवासात अडचणी येतील.

मिथुन (Gemini) : आध्यात्मिक बळ वाढेल. केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कामातून मनाजोगा आनंद मिळेल. वैचारिक दृष्टीकोन बदलला जाईल. ज्येष्ठांचा आदर करा. चर्चेतून तोडगा सापडेल. जाणत्यांचे सल्ले लाभदायी ठरतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. सामान, कागदपत्रांची काळजी घ्या. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

कर्क (Cancer) : कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. दिवसभर कार्यरत राहाल. मानसिक चंचलता जाणवेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. जबाबदाऱ्या सांभाळूनच धाडस करा. कार्यात सातत्य राखल्यास आत्मविश्वास वाढेल. व्यवहार करताना सावधानता बाळगावयास हवी. जीवनसाथी आपल्याला चांगली साथ देईल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. अनेकांचे सहकार्य मिळेल.

Advertisementसिंह (Leo) : घरातील कामे आनंदाने कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पोटाचे किरकोळ आजार संभवतात. जोडीदाराविषयी मतभेद वाढवू नका. स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल. शब्द, वेळ आणि पैसा यांचे नियोजन अत्यावश्यक आहे. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे आहे. प्रयत्नांमध्ये सातत्य राखा. अनपेक्षितपणे लोक मदत करतील. एखादी व्यक्ती अपेक्षाभंग करेल.

कन्या (Virgo) : भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. व्यापारी वर्ग खुश राहील. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. वादविवादात भाग घेऊ नका. प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास यश मिळेल. ओळखीतल्यांचे सहकार्य लाभेल. गृहसौख्य लाभेल. जवळच्यांना वेळ देणे आवश्यक आहे. सप्ताहाच्या पूर्वार्धात प्रवासात दगदग होईल. त्यामुळे, प्रवासाचे नियोजन नीट केले पाहिजे.

तुळ (Libra) : आपलेच म्हणणे खरे कराल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील. सहकुटुंब सहलीचा बेत आखाल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. दक्षता घ्यावयास हवी. गोड बोलुन कार्यभाग साधण्याचे धोरण स्विकारावे. झेपतील अशाच जबाबदाऱ्या स्विकारा. थोडे हिशोबी राहणे आवश्यक आहे. उतर्रार्धात अनुकूल प्रवास होतील. आर्थिक आवक चांगली राहिल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल.

वृश्‍चिक (Scorpio) : गप्पांमध्ये रंगून जाल. व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील. आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल. काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा. चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल. वेळ पाहून बोलणे आणि योग्य वेळी संधी साधणे हिताचे ठरेल. जबाबदारीने काम केल्यास फायदा होईल. नियोजन लाभाचे आहे. ग्रहमानाची समर्थ साथ राहिल, त्यामुळे कामे आटोक्यात येतील. अनेकांचे सहकार्य मिळेल, थोडी आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.

Advertisementधनु (Sagittarius) : वैयक्तिक स्वातंत्र्य जपावे. नवीन मित्र जोडावेत. उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. चांगले वाहन सौख्य लाभेल. ऊर्जेचा सकारात्मक वापर लाभ मिळवून देईल. लेखनकार्य फायद्याचे ठरेल. वाणी, संयम आणि कृतीवर भर दिल्यास प्रगती होईल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. अनुकूल घटना घडतील. चांगल्या संधी चालून येतील, प्रवासात काळजी घ्या.

मकर (Capricorn) : उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी केल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक कामात रमून जाल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्नांमधील सातत्य यश मिळवून देईल. आर्थिक नियोजनावर भर देणे हिताचे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. मनात सैरभैर विचार सुरू असताना वाहन चालवणे टाळा. आर्थिक आवक चांगली राहिल.

कुंभ (Aquarious) : जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा. काटकसरीने वागाल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. चांगली संगत लाभेल. परिस्थितीशी जुळवून घेणे लाभाचे. घरच्यांना वेळ द्याल. चर्चेतून मार्ग काढाल. वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यात यश मिळेल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. मुलांना अपेक्षित संधी मिळतील. आर्थिक उलाढाली जपून करा, कुणी तुम्हाला गोत्यात आणण्याचा प्रयत्न करू शकते.

मीन (Pisces) : स्त्री वर्गापासून जपून राहावे. कामाची व्याप्ती वाढेल. ओळखीतून कामे मार्गी लागतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक नियोजन हिताचे. कोणतीही कृती विचारपूर्वक आणि आवश्यक ती चौकशी करुनच करा. चांगल्या संधी चालून येतील. नवीन संधी फायद्याच्या ठरतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. प्रवासाचे योग येतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील.

Advertisement