SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पीएम किसान योजनेचे 2000 रुपये मिळाले का..? ‘इथे’ करा तक्रार..!

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा 11वा हप्ता नुकताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला.. देशातील 10 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत प्रत्येकी 2000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. त्यासाठी 21 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय..

गेल्या काही दिवसांत अनेक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात 2000 रुपये आले असून, तसे मेसेज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांना अजूनही हे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे..

Advertisement

काही कारणास्तव तुमच्याही खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे आले नसतील, तर घाबरण्याचे कारण नाही.. याबाबत तुम्हाला केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करता येते. त्याची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असते, हे सविस्तर जाणून घेऊ या..

अशी करा तक्रार..!
पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे एखाद्या शेतकऱ्याच्या बँक खात्यावर मिळाले नसल्यास, याबाबत तक्रार केल्यावर तातडीने त्याचे निराकरण केले जाते. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे आले नसतील किंवा त्यात काही तांत्रिक अडचण असेल, तर ती दुरुस्त केली जाते. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योजनेचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आले..

Advertisement

तुमच्या खात्यात 2000 रुपये आले नसल्यास, तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लेखापाल व कृषी अधिकाऱ्यांना माहिती द्या.. त्यांनी जर तुमचं म्हणणं ऐकलं नाही किंवा त्यांनी समस्या जाणून घेतल्यावरही तुमच्या खात्यात पैसे आले नाही, तर तुम्ही हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.

कृषी मंत्रालय हेल्पलाइन क्रमांक

Advertisement
  • पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
  • पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261
  • पीएम किसान लँडलाइन नंबर : 011 – 23381092, 23382401
  • पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
  • पीएम किसानची दुसरी हेल्पलाइन :0120-6025109

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी PM-KISAN Help Desk सोमवार ते शुक्रवार सुरु असते. शिवाय तुम्ही [email protected] या ई-मेलवरही तक्रार करु शकता.. त्यानंतरही काम न झाल्यास, 011-23381092 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकता.

तुम्ही स्वतः या योजनेची स्थिती तपासून अर्ज करू शकता. या योजनेच्या शेतकरी कल्याण विभागात संपर्क साधून तक्रार करता येते.. त्याचा दिल्लीतील फोन नंबर 011-23382401 आहे, तर त्याचा ई-मेल आयडी [email protected] आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement