SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

UPI पेमेंट फेल होऊन पैसे अडकल्यास तात्काळ मदत मिळणार; बँकेला कळवण्याचीही गरज नाही

गेल्या दोन वर्षांपासून आपण डिजिटल पेमेंट करण्यावर अधिक भर देत आहोत. पैसे सांभाळणे, ते व्यवस्थित भरणे यापेक्षा आपल्याला हा पर्याय सोयीस्कर वाटतो. पेमेंट करताना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) हा अलिकडच्या वर्षांत सर्वाधिक वापरलेला मोड आहे. अनेकदा हे पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण होते, तर बऱ्याचदा अयशस्वी देखील होते. पेमेंट न झाल्यामुळे UPI यूजर्स नाराज होतात. कधी कधी तर फसवणूक होईल की काय? अशीही शंका येते. परंतु आता चिंता करण्याचे कारण नाही. UPI यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

 

एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आसबे यांनी सांगितले की, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा NPCI UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिजॉल्युशन सिस्टम तयार करण्यावर काम करत असून सप्टेंबर 2022 पर्यंत रिझोल्यूशन सिस्टम कार्यान्वित होईल. ही अॅपमधील फीचर्ससह सुमारे 80-90 टक्के पेमेंट फेल्युअर रिअल टाइममध्ये सोडवले जातील.

 

Advertisement
आम्ही ऑनलाइन डिस्पुट रिजॉल्युशनवर काम करत असून पुढील तीन महिन्यांत, UPI इकोसिस्टममधील 80-90 टक्के डिस्प्युट ऑनलाइन सोडवले जातील. पुढील 3 महिन्यांत ग्राहकांना बँकेत कॉल करण्याची किंवा कुठेही जाण्याची गरज भासणार नाही, फक्त अॅपवर UPI च्या मदतीने प्रॉब्लेम रिअल टाइममध्ये सोडवला जाईल, अशी माहिती पुढे बोलताना आसबे यांनी दिली.

 

UPI ही एक अशी रिअल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जी एका बँक खात्यातून दुसऱ्या बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देते. विशेष म्हणजे आपण UPI द्वारे पैसे कधीही, रात्री किंवा दिवसा ट्रान्सफर करू शकता. यासाठी आपल्या मोबाईलमध्ये Paytm, Phonepe, Google Pay, BHIM इत्यादी कोणतेही UPI अॅप डाउनलोड करावे लागेल. आपले बँक खाते UPI अॅपशी लिंक करून ही सिस्टम वापरू शकतो.

 

Advertisement
UPI द्वारे, आपण एक बँक खाते एकाधिक UPI अॅप्सशी लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष बाब म्हणजे आपल्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी अशी एकच माहिती असली तरीही UPI पैसे ट्रान्सफर करते.