SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी अधिकारी होण्याची संधी, ‘एमपीएससी’मार्फत 1085 जागांसाठी भरती..!

महाराष्ट्र लोकसेवा आयोग.. अर्थात ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी विभागांतील रिक्त पदांच्या भरतीला सरकारने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध आहे. (MPSC recruitment)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब करिता तब्बल 1085 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे लागणार आहेत.. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

अटी व नियम

– परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ‘ब’ मुख्य परीक्षा
– पदाचे नाव – सहायक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक

Advertisement

एकूण पद संख्या – 1085 जागा

अर्ज शुल्क

Advertisement
  • जनरल : 544 रुपये
  • राखीव प्रवर्ग – 344 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज सुरू झाल्याची तारीख – 3 जून 2022

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

Advertisement

एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या वरील पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.

आवश्यक कागदपत्रे

Advertisement
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणित प्रमाणपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • ओळखपत्र
  • पासपोर्ट फोटो

केंद्र – अमरावती, औरंंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई आणि पुणे.

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

Advertisement

शासन निर्णय पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा www.maharashtra.gov.in 

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement