SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवणार ‘हा’ खास अभ्यासक्रम… शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..!

गेली दोन वर्षे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु होता.. सारं काही ठप्प झालं होतं.. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बोजवारा उडाला होता. ऑनलाईन शिक्षण सुरु असलं, तरी त्याला अनेक मर्यादा होत्या.. परिणामी विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं.. विद्यार्थ्यांचे झालेले हे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे..

विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा ‘सेतू’ अभ्यासक्रम (Setu course) राबवला जाणार आहे. दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, गणित, सामाजिक शास्र या विषयांसाठी मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमातील ‘सेतू’ अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर 30 दिवसांत हा अभ्यासक्रम राबवला जाईल..

Advertisement

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम. डी. सिंह यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे गेली वर्षभर राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने व नियमित सुरू नव्हत्या. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात विद्यार्थी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्र या विषयांत कच्चे राहिल्याचे दिसून आले..

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी गेल्या वर्षी पहिल्यांदा ‘सेतू’ अभ्यासक्रम राबवला होता. त्याची परिणामकारकता तपासण्यासाठी अभ्यास केला असता, ‘सेतू’ अभ्यासक्रम परिणामकारक ठरत असल्याचे दिसून आले.. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा सेतू अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

‘सेतू’ अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबत माहिती देण्यासाठी 9 जूनला ‘ऑनलाइन’ उद्बोधन सत्र होणार आहे. पुढील वर्गात जाण्याआधी विद्यार्थ्यांना पूर्वीच्या वर्गातील अभ्यास समजणं महत्वाचं आहे. या दृष्टीने ‘सेतू’ अभ्यासक्रमाची पुनर्रचना केली आहे. या अभ्यासक्रमात ‘विद्यार्थीकेंद्रित’ व ‘कृतिकेंद्रित’ कृतिपत्रिका तयार केल्या आहेत.

‘सेतू’ अभ्यासक्रमाचे वेळापत्रक

Advertisement

पूर्व चाचणी

  • राज्यातील शाळा- 17 व 18 जून
  • विदर्भातील शाळा – 1 व 2 जुलै

30 दिवसांचा ‘सेतू’ अभ्यासक्रम

Advertisement
  • राज्यातील शाळा- 20 जून ते 23 जुलै
  • विदर्भातील शाळा – 4 जुलै ते 6 ऑगस्ट

उत्तर चाचणी

  • राज्यातील शाळा- 25 ते 26 जुलै
  • विदर्भातील शाळा – 8 ते 10 ऑगस्ट

दरम्यान, शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी स्वयंअध्ययन करू शकतील, असे कृतिपत्रिकांचे स्वरुप आहे. सेतू अभ्यासक्रमापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्वचाचणी व सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी घेतली जाणार आहे. ‘सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नियमित अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement