SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोठी बातमी : पुन्हा वाढू शकतो कर्जाचा EMI! रेपो रेट वाढीबाबत महत्वाची माहिती आली समोर

मुंबई :
मागील काही दिवसांपासून देशात महागाईने थैमान मांडले आहे. सध्या तर महागाई सर्वोच्च स्तरावर आहे. अन्न-धान्य सारख्या जीवनावश्यक वस्तू ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच गोष्टींचे भाव वाढले आहेत. वाढत्या भाव वाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. महागाई आत्ता कळीचा मुद्दा बनत चालला आहे. दिवसेंदिवस महागाईचा आलेख कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. अशातच एक धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे.

 

 

Advertisement
वाढत असलेली महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून काही पाऊले उचलण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आपल्या कर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

 

 

Advertisement
आरबीआयने गेल्याच महिन्यात रेपो रेटमध्ये 40 बेसीस पॉईंटची वाढ केली आहे. पुन्हा एकदा रेपोरेट वाढवल्यास त्याचा परिणाम हा ईएमआय वाढीवर होणार आहे.  तज्ज्ञांच्या मते केवळ रेपो रेटमध्ये वाढ करून महागाईचा प्रश्न सुटणार नाही, महागाई मुबलक चलनामुळे आलेली नसून, वस्तुंच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली आहे.

 

 

Advertisement
एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत रेपो रेटबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीलाच आरबीआयने एमपीसीची अपातकालीन बैठक बोलावून अचानक रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मिळत असलेल्या माहितीनुसार येत्या सहा ते नऊ जूनदरम्यान होणाऱ्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा आरबीआय रेपो रेटमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेऊ शकते. यावेळी रेपो रेटमध्ये 0.40 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

 

Advertisement
बोफा सिक्योरिटीजने म्हटले आहे की, टोमॅटोचे भाव वाढल्याने मेमध्ये महागाई वाढली. मुख्य महागाई 7.1 टक्क्यांवर पोहोचली आहे. मागील दिवसांत महागाईपासून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्राकडून काही पाऊल उचलण्यात आले आहेत. त्यातील महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या अबकारी करात कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर सात रुपयांनी स्वस्त झाले.