मुंबई :
कोरोनाचे (Coronavirus) सावट अद्याप दूर झाले नाही. कोरोनाबाबतची (Covid-19) भीती कायम असून आता पुन्हा कोरोनाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मुंबईत रुग्णवाढ होताना दिसत आहे. गेल्या 7 दिवसात मुंबईत तब्बल दुप्पट रुग्णवाढ झाली आहे. आता पुन्हा एकदा रुग्णवाढीमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लादण्याची शक्यता आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक असेल. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. ट्रेन, बस, सिनेमा हॉल आणि ऑडिटोरियममध्ये मास्क सक्तीचे करण्यात आले आहे. रुग्णालये, महाविद्यालये आणि शाळांमध्येही मास्क अनिवार्य असेल.
राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक असेल. वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. आरोग्य सचिवांलयाकडून प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांना अलर्ट देत पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, संसर्गाचा प्रसार वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत.
दरम्यान टास्क फोर्सनेही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची सूचना केली होती. आता इथून पुढे मास्क बंधकारक असेल. रेल्वे, बस, सिनेमागृह, सभागृहे, रुग्णालये, कॉलेज, शाळा या ठिकाणी वावरत असताना मास्क लावणं सक्तीचं असेल.
मागच्या काही दिवसात राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनास्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. कोरोना रुग्णांची संख्या जास्त वाढू नये, म्हणून सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या नियमांचं पालन करत सहकार्य करण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.