SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Mobile Care Tips : ‘या’ तीन हलगर्जीपणामुळे आपला स्मार्टफोन येतो धोक्यात

स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आज अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांकडून देखील स्मार्टफोन वापरले जातात. आपली सगळी लहान मोठी कामे, मनोरंजन, शिक्षण, कार्यालयीन कामे या सगळ्यांमध्ये फोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्याची काळजी घेणे हे अतिशय गरजेचे काम आहे. बऱ्याचदा आपल्याकडून फोन वापरताना अशा काही चुका होतात, ज्यामुळे आपला फोन धोक्यात येतो. मोबाईल थेट कचऱ्याच्या डब्ब्यात फेकायची वेळ येऊ शकते. ही वेळ येवू नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. आज आपण फोन खराब होण्याची कारणे व उपाय दोन्ही जाणून घेऊ या..

 

 

Advertisement
दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरणं :- नेहमी असं होत की, आपण आपला चार्जर घरी ठेवतो किंवा कधीतरी सोबत ठेवायला विसरतो. अशावेळी ऑफिसमध्ये किंवा बाहेर कुठेही सवयीनुसार कुणाचा तरी चार्जर मागून फोन चार्ज करून घेतो. मात्र असं करणं फोनच्या आरोग्याच्या हानी पोहचवत. कारण दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरल्याने  फोन खराब होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे दुसऱ्या कंपनीचा चार्जर वापरणे टाळायला हवे.

 

 

Advertisement
टेम्पर्ड ग्लास :- ही आपल्याकडून वारंवार जाणूनबुजून होणारी चूक आहे. आपल्या फोनवरील टेम्पर्ड ग्लास खराब झाली असेल तर आपण आज बदलू उद्या बदलू म्हणून ही गोष्ट उद्यावर ढकलतो. अशात आपला फोन कुठे पडला तर मात्र आपल्याला मोठं नुकसान होते. त्यामुळे तात्काळ चांगल्या क्वालिटीची टेम्पर्ड ग्लास बसवून घेणं अनिवार्य आहे.

 

 

Advertisement
रात्रभर फोन चार्जिंगवर ठेवणं :- आपण रात्री झोपताना आपला फोन चार्जिंगवर ठेवतो आणि झोपी जातो. जवळपास सगळ्यांना अशी सवय असते. सकाळी आपल्याला फोन फुल चार्ज मिळतो खरा, मात्र त्याचा परिणाम तुमच्या फोनवर आणि बॅटरीवर होत असतो. यामुळे तुमच्या फोनचा परफॉर्मन्स खालावण्याची शक्यता असते. याचे तत्कालीन परिणाम आपल्याला दिसत नाही, परंतु दूरगामी परिणाम होत असतात.

 

 

Advertisement
खरं तर आपला फोन म्हणजे आपला जीव असतो. त्याला जपणं व योग्य खबरदारी घेणं ही आपली जबाबदारी आहे. फोन खराब झाल्यानंतर आपल्याला खूप त्रास, गैरसोय सहन करावी लागते. परंतु त्याची वेळीच योग्य काळजी काळजी घेतली तर हे नुकसान टाळता येऊ शकते.