ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन, जगभरातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्याही इलेक्ट्रिक वाहनांची (e-vehicles) निर्मिती करण्याकडे वळल्या आहेत. स्कूटर, बाईक, कार इतकंच काय तर अगदी बसही आता इलेक्ट्रिक अवतारात बाजारात दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज (ता. 4) आणखी एक मोठी घोषणा केली.
गडकरी यांची मोठी घोषणा..
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांनी लवकरच आपण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर व ट्रकही लॉंच करणार असल्याचे जाहीर केलं.. ते म्हणाले, की “मला आठवतं, 3 वर्षांपूर्वी मी जेव्हा ‘ई-व्हेईकल्स’बाबत बोललो होतो, तेव्हा लोकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, पण आता पाहा ‘ई-व्हेईकल्स’लाच मोठा प्रतिसाद मिळतो आहे..”
Alternative fuel like ethanol & methanol as well as electric is the future. I remember, 3 years ago when I used to talk about e-vehicles, people use to question me. But see now, there is a lot of demand for e-vehicles. People are in waiting: Union Minister Nitin Gadkari, in Pune pic.twitter.com/91RHjtRidW
— ANI (@ANI) June 4, 2022
Advertisement
लोक इलेक्ट्रिक वाहनं घेण्यासाठी वेटिंगला आहेत. ‘इथेनॉल’ व ‘मिथेनॉल’ या पर्यायी इंधनानंतर आता ‘इलेक्ट्रिक’ वाहनं हेच भविष्य असणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक कार, तसेच इलेक्ट्रिक बसनंतर लवकरच मी ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ आणि ‘इलेक्ट्रिक ट्रक’ही लॉंच करणार असल्याचे मंत्री गडकरी यांनी जाहीर केलं..
सोशल मीडियावर ट्रोल
दरम्यान, गडकरी यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.. नेटकरी त्यांच्या या घोषणेची खिल्ली उडवताना दिसतात. आधी विजेचा प्रश्न सोडवा, मग अशा घोषणा करा.. त्यापेक्षा ‘सोलर न्यूक्लिअर पॉवर’चा विचार करावा, हाच सध्या बेस्ट ऑप्शन आहे, असाही सल्ला एकानं दिलाय..
‘सोनालिका इंडिया’ या ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीनं आधीच ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ची घोषणा केली आहे. कदाचित गडकरी यांना हे माहिती नसावं. भारतीय रस्त्यांवर ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ व इलेक्ट्रिक ‘ट्रक’ यशस्वी ठरणार नसल्याचं एकानं म्हटलं आहे..
दरम्यान, आपल्या मोठमोठ्या घोषणांसाठी केंद्रीय मंत्री गडकरी हे प्रसिद्ध आहेत. शिवाय, जाहीर केलेल्या घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.. त्यामुळे लवकरच भारतीय रस्त्यावर ‘इलेक्ट्रिक ट्रक’ नि ‘इलेक्ट्रिक ट्रॅक्टर’ दिसले, तर नवल वाटायला नको..!!