SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कर्ज घेतलंय? मग कर्जाचे हप्ते भरताना ‘घ्या’ ही काळजी; अन्यथा..

सध्या मागील दोन वर्षांपासून चालत असलेल्या कोरोना पार्श्वभूमीमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली असल्याचं आपल्याला दिसलंच असेल. अशा वेळी कोणी उधार पैसे घेतं तर कोणी कर्ज घेतात. आपला पगार आणि खर्च जाऊन आपण हप्ते देऊ शकतो का हे देखील आपण विचार करूनच कर्ज घेत असतो. चला मग जाणून घेऊ कर्ज फेडताना तुम्हाला आणखी काय गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात..?

▪️ कर्ज घेण्यापूर्वी, तुमचा इन्कम किंवा पगार किती आहे, घर खर्च, बिल, तुमचा दैनंदिन खर्च आणि मग दर महिन्याला तुम्हाला कर्जाचा किती हप्ता द्यायचा आहे किंवा किती द्यावा लागू शकेल हे कर्ज घेताना माहीत करून घ्या. जेणेकरून ईएमआय किती असेल हे समजले की नियोजन करता येईल.

Advertisement

▪️ महत्वाचं म्हणजे जर तुम्ही जितक्या उत्साहाने कर्ज घेत असाल, तितक्याच उत्साहाने ते फेडायला हवे. कर्जाची मर्यादा कितीही असो ते तुम्ही घेतले असेल तर फेडण्याची जबाबदारीही तुमचीच आहे, हे विसरू नका.

▪️ कर्ज घेताना आपला सिबील स्कोअर (CIBIL Score For Loan) किती आहे हे तपासा, कारण कोणतंही कर्ज देताना बँक सर्वात आधी हे पाहून कर्ज देतात. म्हणून कर्जाची परतफेड (Loan Repayment) करण्यासाठी एक दिवस आधीच पैशांची तजवीज करून ठेवा आणि हप्ता भरा.

Advertisement

▪️ लक्षात ठेवा कर्ज घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आर्थिक शिस्त असणे महत्वाचं आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल, तर त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी या अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सध्याचे कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज अजिबात घेऊ नका कारण तुम्हाला ते कर्जाच्या सापळ्यात अडकवू शकते.

▪️ तुम्ही कर्जाची परतफेड वेळेवर केली नाही, तर सिबील खराब होतो. जरी तुम्ही इतरत्र कर्ज घेतलं असेल तर त्याचे हप्ते वेळेवर फेडले तरी क्रेडिट स्कोअर तसाच राहतो आणि जर हप्ते वेळेवर फेडले नाहीत तर तो क्रेडिट स्कोअर खराब होईल पण तो त्यानंतर जेव्हा वाढेल तेव्हाच बँक, फायनान्स कंपन्या तुम्हाला यानंतर कर्ज देऊ शकतील.

Advertisement

▪️ विशेष अशी एक गोष्ट आहे की, आपण आपल्याला जितक्या पैशांची गरज पडेल तेवढेच कर्ज घ्या. म्हणजे ईएमआय तुम्हाला परवडेल एवढाच असावा. तुम्हाला भरावा लागणारा ईएमआय तुमच्या पगाराच्या किंवा उत्पन्नाच्या 40 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा, असं नियोजन करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा

▪️ कर्ज फेडण्यासाठी पैसे जमा होतील. पण नेमका खर्च कशावर करायचा आहे त्याची यादी तयार करा. जसे की वीज बिल, शाळेची फी, घर खर्च, प्रवास खर्च अशा नियमित लागणाऱ्या खर्चाची यादी बनवा बजेटनुसार खर्च करा. म्हणजे महिन्याला तुमची आणखी बचत होईल.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement