SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महागाईत संधी! भन्नाट ऑफरमध्ये अवघ्या 400 रुपयात खरेदी करा बेस्टसेलर स्मार्टफोन्स

मुंबई :
सध्या देशभरात लग्नसराई तसेच विविध सण उत्सव आहेत, त्यामुळे बहुतांश ई-कॉमर्स कंपन्यांनी आता ऑफर्स चालू केल्या आहेत. अशातच फ्लिपकार्टचा एक जबरदस्त सेल चालू आहे, ज्यात आपल्याला एकदम तगड्या ऑफर्स मिळत आहेत. जर तुम्हीही मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये तुम्हाला अगदी 400 रुपयात सुद्धा मोबाईल मिळू शकतो. कारण या सेलमध्ये एक्सचेंज ऑफरसह इतरही विविध ऑफर आहेत.

 

 

Advertisement
फ्लिपकार्टवर (Flipkart) आजपासून Big Bachat Dhamaal Sale सुरू झाला आहे. 5 जूनपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन्सवर बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा मिळेल. सेलमध्ये तुम्ही सॅमसंग, रेडमी, ओप्पो, इनफिनिक्स सारख्या फोन्सला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता.

 

 

Advertisement
सॅमसंग गॅलक्सि F22 :- 14,999 चा हा फोन सेलमध्ये अवघ्या 11,999 रुपयात मिळतोय. फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 600 रुपयांची बचत होईल. याशिवाय, फोनवर 11,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. दोन्ही ऑफरचा फायदा मिळाल्यास हा फोन फक्त 149 रुपयात तुमचा होईल.
रेडमी 10 :- 14,999 रुपये किमतीचा हा फोन 10,499 रुपयात उपलब्ध होईल. ICICI Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 500 रुपये इंस्टंट डिस्काउंट आणि 9,759 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. या सगळ्या ऑफर्स मिळाल्या तर हा फोन 249 रुपयात घरी नेता येईल.

 

 

Advertisement
ओप्पो A16 :- 15,990 किमतीचा हा भन्नाट फोन या सेलमध्ये 12,990 घरी नेऊ शकता. त्यानंतर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केलं तर थेट 650 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट मिळेल. याशिवाय, फोनवर 11,250 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा फोन फक्त 340 रुपयात तुमचा होईल.
पोको C31 :-
या फोनची मूळ किंमत 11,999 रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर 9,999 रुपयात उपलब्ध आहे. यावर 9,250 रुपये एक्सचेंज ऑफर आणि 500 रुपये बँक ऑफर मिळत आहे. अशाप्रकारे हा फोन फक्त 249 रुपयात तुमचा होईल.