SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मंहगाई डायन खाए जात है; म्हणून आता कपडे खरेदी करणेही महागणार

मुंबई :

चढता महागाईचा आलेख सर्वसामन्य जनतेची दिवसेंदिवस चिंता वाढवत आहे. सर्व वस्तूंचे दर वाढल्याने अनेकांच्या आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे. भाजीपाला, धान्य, तेल, इंधन आणि इतर जीवनावश्यक वस्तूचे दर आधीच गगनाला भिडले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दरही सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करत आहे. त्यात आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे. आता कपडे घालने देखील महागणार आहे, कारण त्यांच्या किमती वाढणार आहे.

Advertisement

वस्त्रोद्योग (Textile Industry) 12 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगावरील जीएसटी वाढल्यास कपडे खरेदी करणे पूर्वीपेक्षा महाग होणार आहे.

सध्या टेक्सटाईलवर 5 टक्के जीएसटी (Goods and services tax) आकारला जातो, तर सरकार आता तो 12 टक्के करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी देखील कापड उद्योगावर 12 टक्के जीएसटी जाहीर करण्यात आला होता जो या वर्षाच्या सुरुवातीला लागू होणार होता. परंतु तीव्र विरोधानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला. मात्र पुन्हा एकदा जीएसटी कौन्सिलच्या पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Advertisement

याशिवाय ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो रेस कोर्सेसवर 28 टक्के जीएसटी लावला जाऊ शकतो. मंत्र्यांच्या गटाला वस्तू आणि सेवा करासाठी 6 महिन्यांची मुदत दिली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. सर्वसाान्यांसाठी ही नक्कीच खिशावर ताण पडणारी बातमी आहे. कारण आताच अन्न धान्य, इंधन या गोष्टीशी जुळवाजुळव करताना नाकीनऊ येत आहेत. यामध्ये कपड्यांच्या महागाईची बातमी आणखी चिंता वाढविणारी आहे.

Advertisement