SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कारणामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढणार? वाचा आजचे ताजे दर..

जगातील बहुतेक देशांमध्ये महागाई वाढवण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा, सोन्या चांदीचा, क्रूड ऑईलचा मोठा वाटा आहे. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात रशिया-युक्रेन युद्ध (Russia-Ukraine war) सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने मोठी वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात काही महिन्यांपासून चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत कच्च्या तेलाच्या (Crud Oil) किंमती देखील कमी-जास्त होऊन किंमतीत नेहमीच चढ-उतार सुरू असल्याचं दिसत आहे. गुरूवारी कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल 10 डॉलरने घसरले असताना आज (ता. 3 जून) कच्चा तेलाच्या दरात वाढ होऊन ते प्रतिबॅरेल 117 डॉलरच्या वर पोहोचले आहेत.

Advertisement

रशियन तेल खरेदी बंद झाल्यामुळे पुरवठा खंडित झाला असताना हा प्रकार घडला आहे. त्याची भरपाई करण्यासाठी ओपेकने उत्पादन वाढवण्याचे आश्वासन दिले असले आणि यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील असा अंदाज बांधला गेला होता. पण सध्याची परिस्थिती पाहता तरी सध्या जागतिक स्तरावर पुरवठ्यावर संकट आहे.

आजच्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावानुसार इंधनाच्या किंमतीतसुद्धा मोठी वाढ होत असते. ही वाढ भारत सरकारच्या निर्णयावर अवलंबून असते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्यानंतर भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर (Petrol Diesel Latest Price Today) जाहीर केले आहेत.

Advertisement

आजच्या ताज्या दरानुसार, आज शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज जाहीर झालेल्या नवीन दरानुसार, मुंबईत पेट्रोल (Petrol Price Mumbai) 109.27 रुपये लिटर आणि डिझेल 95.84 रुपये प्रति लिटर आहे. त्याचप्रमाणे राजधानी दिल्लीत 96.72 प्रतिलिटर असा पेट्रोलचा भाव आहे. शुक्रवारी सकाळी कच्चा तेलाचे भाव दर प्रति बॅरल 117 डॉलरवर पोहचले आहे. मात्र आज त्यात वाढ होवूनही पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर कायम आहेत.

प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे आजचे भाव:

Advertisement

▪️ मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपये

▪️ दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रतिलिटर

Advertisement

▪️ कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये

▪️ चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement