SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 5 हजारांत ‘पोस्टा’सोबत व्यवसाय सुरु करा नि कमवा बक्कळ पैसा.. तुम्हाला फक्त ‘हे’ करावं लागेल..!

आधुनिक तंत्रज्ञान येत असलं, माणूस प्रगत होत असला, तरी एका गोष्टीचं महत्व आजही कायम आहे, ते म्हणजे पोस्ट ऑफिस… गाव-खेड्यापासून अगदी महानगरांपर्यंत साऱ्यांची आवडती सरकारी संस्था. संदेश, पत्रं, भेटवस्तूंची देवाण-घेवाण करण्यासाठी आजही पोस्ट ऑफिस सर्वाधिक विश्वासार्ह समजलं जातं.

गेल्या काही दिवसांत या सरकारी संस्थेनंही (Post Office) कात टाकलीय.. नागरिकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन पोस्टानं वेगवेगळ्या सोयी-सुविधा सुरु केल्यात.. अगदी गुंतवणूक क्षेत्रातही पोस्ट ऑफिस उतरलंय.. एक विश्वासार्ह पर्याय म्हणून पोस्टाचा आज विचार केला जातो.

Advertisement

पोस्टाच्या विविध गुंतवणुक योजनांतून नागरिकांचा चांगला फायदाही होतो.. मात्र, आता पोस्टात अगदी थोडीसी गुंतवणूक करुन कमाईची संधी मिळते.. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी (Post Office Franchise) घेता येईल व त्याद्वारे अनेक मार्गांनी पैसा कमावू शकता.

किती गुंतवणूक करायची..?
देशात पोस्टाच्या दीड लाखांपेक्षाही जास्त शाखा असल्या, तरी कामाचा वाढलेला ताण पाहता, आणखी काही नव्या शाखा सुरु करण्याची गरज आहे.. त्यामुळे पोस्टाची फ्रँचायजी तुम्हाला घेता येईल.. पोस्टाची फ्रँचायजी सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये लागतील..

Advertisement

पोस्टाच्या दोन प्रकारच्या फ्रँचायजी आहेत. फ्रँचायजी आउटलेट (Franchise Outlet) व पोस्टल आउटलेट (Postal Outlet). त्यापैकी कोणतीही फ्रँचायजी तुम्ही सुरु करु शकता. त्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करावा लागेल.

पात्रता

Advertisement
  • फ्रँचायजी घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावं.
  • भारताचा कोणीही नागरिक पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊ शकतो.
  • कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून उमेदवार 8 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

किती कमाई होते..?
– नोंदणीकृत वस्तूंच्या बुकिंगसाठी, प्रत्येक व्यवहारामागे 3 रुपये कमिशन मिळतं..स्पीड पोस्ट (Speed Post) बुकिंगसाठी 5 रुपये कमिशन मिळतं.
– मनी ऑर्डर (Money Order)- 100 ते 200 रुपये मनी ऑर्डरसाठी साडेतीन रुपये, 200 रुपयांवरील मनी ऑर्डरसाठी 5 रुपये कमिशन दिलं जातं. फ्रँचायजीसाठी मनी ऑर्डरची कमीत कमी मर्यादा 100 रुपये आहे. त्यापेक्षा कमी रकमेची मनी ऑर्डर बुक करता येत नाही.

– 1000 नोंदणीकृत आणि स्पीड पोस्टच्या बुकिंगचं मासिक लक्ष्य पूर्ण केल्यास 20 टक्के अतिरिक्त कमिशन मिळतं.
– पोस्टाची तिकीटं आणि स्टेशनरी विक्रीवर 5 टक्के कमिशन निश्चित केलंय. महसुली शिक्के, केंद्रीय भर्ती शुल्क तिकीटांच्या विक्रीसह किरकोळ सेवांसाठी 40 टक्के कमिशन दिलं जातं..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement