भारत सरकार सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक योजना आणत असते. प्रत्येक वर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातात. मागील काही दिवसांत रेशन कार्ड संबंधी खूप महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते.
सरकार रेशन कार्डच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना गरजेच्या वस्तू पुरवत असते. याचा लाभ देशातील मोठ्या प्रमाणात गरीब कुटुंबे घेत आहेत.
देशभरात महागाईने उच्चांक ओलांडल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्य दरातही वाढ झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारने शिधापत्रिकाधारकांना मोफत सिलिंडर देण्याची मोठी घोषणा केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्त रेशनसह आता शिधापत्रिका धारकांना उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस सिलिंडरचा लाभ दिला जाणार आहे.
उत्तराखंड मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव एसएस संधू म्हणाले होते की, या निर्णयामुळे राज्यातील 1,84,142 अंत्योदय कार्डधारकांना फायदा होणार आहे. 3 मोफत गॅस सिलिंडर दिल्याने सरकारवर सुमारे 55 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. पूर्वीप्रमाणेच यंदाही गव्हाच्या खरेदीवर शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 20 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत, आतापर्यंत केवळ अंत्योदय कार्डधारक, एससी एसटी, मागासवर्गीय लोक उज्ज्वला योजनेसाठी पात्र होते, परंतु आता सामान्य श्रेणीतील लोकांनाही उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरचे मोफत वाटप केले जाणार आहे. त्यामुळे मोफत गॅस सिलिंडरच्या घोषणेनंतर उत्तराखंड राज्यातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
Advertisement