SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हालाही ‘या’ नंबरवरुन WhatsApp मेसेज आला असेल तर व्हा अलर्ट; अकाउंट होणार रिकामे

मुंबई : 

सोशल मीडिया आणि चॅटिंग अॅप्स आता प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत आणि अनेकजण कनेक्ट राहण्यासाठी तसेच एकमेकांशी बोलण्यासाठी वेगवेगळे अॅप्स आणि प्लॅटफॉर्म वापरतात. मात्र, व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर केला जातो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या खालोखाल फेसबुकचा वापर होतो.

Advertisement

काही काळापूर्वी व्हॉट्सअॅपवर उघड झालेला एक मोठा घोटाळा पुन्हा एकदा समोर आला आहे. ज्यामध्ये यूजर्सला एकदम जबरदस्त आणि आकर्षक असे मेसेज पाठवले जात आहेत. WhatsApp वर, वापरकर्त्यांना +92 306 037 3744 या क्रमांकावरून लॉटरी जिंकण्याबद्दल संदेश पाठवला जात आहे. एक व्हॉइस नोट देखील पाठवली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, घोटाळेबाज हे संदेश प्रामाणिक दिसण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे फोटो आणि ‘कौन बनेगा करोडपती’ म्हणजेच KBC चे नाव वापरत आहेत.

या नंबरवरून पाठवलेल्या मेसेजमध्ये तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली असून पैसे लगेच तुमच्या खात्यात जमा होतील, असे लिहिले आहे. इतकंच नाही तर ज्यावर फोन करायचा आहे. ‘07666533352’ हा क्रमांक देण्यात आला आहे. संदेशासोबत एक ऑडिओ नोटही दिली जात आहे. ज्यामध्ये तुम्ही लॉटरीचे पैसे तुमच्या बँक खात्यात कसे ट्रान्सफर करू शकता हे सांगितले जात आहे. तथापि, हा एक घोटाळा आहे आणि या संदेशांना प्रत्युत्तर देणे आपल्यासाठी बरेच घातक ठरू शकते. याद्वारे, हे स्कॅमर तुमच्या खात्याचे तपशील चोरत आहेत आणि तुम्ही तुमचे सर्व पैसे गमावू शकता.

Advertisement

तुम्हालाही एखाद्या अनोळखी नंबरवरून मेसेज आला असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की तो तुमची फसवणूक करण्यासाठी पाठवला आहे, तर आधी तो नंबर ब्लॉक करा.

Advertisement