SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बापरे! दुधामध्ये सापडले डिटर्जंट; ‘या’ घरगुती पद्धतीनं ओळखा दुधातील भेसळ

आपल्याकडे दुधाला अमृताची उपमा दिली जाते. दूध हा रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. घरातील सर्वजण विशेषकरून लहान मुले व वृध्द यांच्या आहारात मोठ्या प्रमाणात दूध असते. आपला देश हा जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश असूनदेखील शुद्ध दुधाचा पुरवठा होत नाही. अलिकडेच घरात वापरल्या जाणाऱ्या दुधात सर्वाधिक भेसळ आहे, असे उघड झाले आहे.

 

 

Advertisement
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये भेसळयुक्त दूध विकणाऱ्या दूधवाल्यांना 9 लाख 33 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या आर्थिक वर्षात दुधाची 207 सॅम्पल घेण्यात आली. त्यापैकी 144 सॅम्पलचे रिपोर्ट आले आहेत. त्यापैकी 56 सॅम्पल फेल झाली आहेत. 16 सॅम्पलमध्ये डिटर्जंटचे अंश आढळून आले आहेत. तर 40 सॅम्पलमधून दुधाची साय गायब होती, अशी माहिती अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त अर्चना धीरन यांनी ही माहिती दिली आहे.

 

दूध ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांची स्वच्छता न केल्याने डिटर्जंट आढळून आले, असे त्या यावेळी म्हणाल्या. आता यापुढे सॅम्पल वेळोवेळी घेतली जात आहेत आणि ही कारवाई सुरूच राहणार आहे. घरी राहूनही कुटुंबातील सदस्य स्वतः दुधाची चाचणी करू शकतात, असंही त्या म्हणाल्या.

 

Advertisement
अशी तपासा दुधातील भेसळ :- 
  • एखाद्या चमकणाऱ्या पृष्ठभागावर दूधाचा एक थेंब टाकला तर तो थेंब घरंगळत पुढे जातो आणि मागे त्याच्या पांढऱ्या खुणा दिसतात. परंतु, जर दुधात पाणी मिसळलेलं असेल तर ते दूध लवकर घरंगळत पुढे जातं आणि पांढऱ्या खुणा दिसत नाहीत.
  • टिंक्चर आयोडिनचे काही थेंब टाकल्यावर स्टार्च असलेल्या दुधाला निळा रंग येतो. टिंक्चर आयोडिन औषधाच्या दुकानात सहज मिळतं.

 

  • दुधात युरियाच्या भेसळीची तपासणी करण्यासाठी परीक्षानळीमध्ये थोडं दूध घेऊन त्यात अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर टाकून पाच मिनिटं ठेवायचे. त्यानंतर लाल लिटमस पेपर (Red litmus paper ) दुधात बुडवल्यानंतर लाल कागदाचा रंग निळा झाल्यास दुधात युरियाची भेसळ असल्याचं स्पष्ट होतं.

Advertisement