SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): चांगले पैसे कमावण्याची संधी मिळेल. व्यवसायात भाग्य तुम्हाला साथ देईल. तुमची देवावरील श्रद्धा वाढेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर वर्चस्व गाजवाल. सतत खटपट करत राहाल. कामाचा ताण जाणवेल. प्रेमाच्या दृष्टीने उत्तम मैत्री लाभेल. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल. प्रवासात योग्य सावधानता बाळगावी.

वृषभ (Taurus): कुटुंब आणि मित्र तुम्हाला शक्य ती सर्व मदत करतील. घरातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबात शुभ कार्यक्रम झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. चिकाटी सोडू नका. बर्‍याच दिवसांची हौस पूर्ण करून घ्याल. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. वेळेवर आजाराचे निदान करा. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा.

मिथुन (Gemini) : जर तुम्ही अविवाहित असाल तर या आठवड्यात लग्न होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकाल. मनातील विचित्र कल्पना काढून टाका. विविध मार्गाने लाभ होईल. प्रेम प्रकरणाला बहार येईल. सहृदयतेने मदत करू शकाल. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

कर्क (Cancer) : आठवड्याच्या शेवटी मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. राजकारणाशी संबंधित लोकांशी संबंध निर्माण होऊ शकतात. रेस व जुगार यांतून लाभ संभवतो. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करावे लागेल. डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करावी. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासह आदराने वागा. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

Advertisementसिंह (Leo) : कामात प्रगती होईल. संकटांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही नेहमीच तुमच्या धैर्याचा आणि संयमाचा योग्य वापर कराल. दैवी मदत तुमच्या पाठीशी आहे. नातेवाईकांकडून कौतुक केले जाईल. घरातील वातावरण खेळकर राहील. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. कामे करताना घाईने निर्णय घेऊ नका. आई-वडिलांची साथ लाभेल. आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

कन्या (Virgo) : भागीदारीत केलेले काम तुम्हाला यश देईल. दैनंदिन व्यापाऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी फार कष्ट करावे लागणार नाहीत. राग आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. घरगुती कामे आनंदाने पार पाडाल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणा दिसून येईल. अचानक खर्च वाढू शकतो. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

तुळ (Libra) : उच्च पदावर असलेल्या लोकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. या आठवड्यात व्यवसाय किंवा नोकरीत मान-सन्मान वाढेल. अपचनाचा त्रास जाणवेल. जोडीदाराशी खटके उडू शकतात. बर्‍याच दिवसांनी भावंडांची गाठ पडेल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.

वृश्‍चिक (Scorpio) : मुलांच्या शिक्षणावर अधिक पैसे खर्च होतील. संतती सुख चांगले राहील आणि वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तुम्हाला चांगले कौटुंबिक सुख मिळेल. चारचौघांत आपली कला सादर करा. योग्य संधीची वाट पहावी लागेल. कामातील अडथळे दूर होतील. घरातील मंडळींशी आदराने वागा. शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा. हातात नवीन अधिकार येतील.

Advertisementधनु (Sagittarius) : कुटुंबाबाबत चांगली बातमी मिळाल्याने आनंदाचे वातावरण राहील. तुमची प्रतिभा आणि संभाषण कौशल्य यामुळे तुम्ही इतरांमध्ये चर्चा कराल. मानसिक चंचलता जाणवेल. हातातील कामात यश येईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.

मकर (Capricorn) : मैदानात तुम्ही तुमच्या विरोधकांचा पराभव करू शकाल. तुमची देवावरील श्रद्धा वाढेल. धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग घ्याल. प्रवासात योग्य सावधानता बाळगावी. केलेल्या कामाचे समाधान मिळेल. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. विचारांचे पालन करुन योग्य ती कृती करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे. लव लाईफ उत्तम राहील. नोकरीत पदोन्नती होईल. वायफळ खर्च करणं टाळा. व्यापारात प्रगती होईल.

कुंभ (Aquarious) : तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. तुमचे आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींबद्दल थोडे चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी चंचलता टाळावी. नातेवाईकांशी सामोपचाराचे धोरण ठेवावे. पित्त विकार बळावू शकतो. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती होईल. मीडिया आणि आय.टी. क्षेत्रातील लोकांना आपल्या कार्यात यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मीन (Pisces) : दानशूर स्वभावाचे असल्याने तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काम कराल. तुम्हाला सरकारकडून पैसे मिळतील. या आठवड्यात तुम्हाला सर्व सुविधा मिळतील. खर्चाचे गणित नव्याने मांडावे लागेल. नसती काळजी करत बसू नका. नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. व्यापार आणि नोकरीतील प्रलंबित कामं पूर्ण होतील. उच्चवर्गीय अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल.

Advertisement