SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्मार्टफोन हरवल्यास चिंता नाही; Google चं हे फिचर नक्कीच येतं कामी

मुंबई : 

सध्या स्मार्टफोन हे सगळ्यात महत्त्वाचं साधन झालं आहे. फोन कॉल, चॅटिंग, बिल भरणे, फॉर्म भरणे व इतरही महत्वाची कामे स्मार्टफोनमध्ये सहजपणे होतात, त्यामुळे आपण स्मार्टफोन जिवापेक्षा जास्त सांभाळतो. मात्र कधी कधी विसरभोळेपणामुळे किंवा घाईगडबडीत फोन हरवण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे आपली खाजगी माहिती लीक होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जेव्हा जेव्हा मोबाईल हरवतो तेव्हा तेव्हा गोपनीय माहितीला धोका पोहचण्याची शक्यता असते.

Advertisement

ग्राहकांच्या याच समस्येचा विचार करून स्मार्टफोन एक फीचर आपल्याला हरवलेला फोन शोधण्याची सुविधा देतो आहे. ज्यामुळे आपण आपला फोन हरवल्यानंतरही तो शोधू शकतो, ते ही अगदी सोप्या पद्धतीने.

खालील पद्धतीने आपण हरवलेला फोन ट्रॅक करू शकतो :- 

Advertisement
  • My Device फीचरच्या मदतीने शोधण्यासाठी https://www.google.com/android / find वेबसाइटवर जावे लागेल. याशिवाय, तुम्ही Find My Device अॅपला प्ले स्टोरवरून डाउनलोड देखील करू शकता.
  • फोनमध्ये अँड्राइड 8.0 आणि त्यापुढील व्हर्जन असणे गरजेचे आहे. याशिवाय, फोनच्या सेटिंग्समध्ये जावून Security & location पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Find My Device हा पर्याय ऑन करा. फोनला ट्रॅक करण्यासाठी लोकेशन देखील सुरू असणे गरजेचे आहे.

हरवलेल्या फोन शोधण्यासाठी खालील प्रोसेस केली जाते :- 

  • आपला फोन हरवल्यास कोणत्याही ब्राउजरमध्ये https://www.google.com/android/find ओपन करावे. त्यानंतर स्मार्टफोनशी लिंक असलेल्या गुगल अकाउंटला लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर फोनचे लास्ट लोकेशन, कनेक्टिव्हिटी आणि बॅटरी लाइफ दिसेल. आता पेजच्या उजव्या बाजूला फोनचे करेंट लोकेशन दिसेल.
  • लोकेशन पिनवर क्लिक करून आपण नेव्हिगेशन सुरू करू शकतो. Find My Device च्या मदतीने आपण डिव्हाइसला लॉक देखील करू शकतो.
  • आपल्याला डेटा डिलीट करण्याची देखील सुविधा मिळते. यासाठी आपल्याला Erase Device पर्याय निवडावा लागतो.

Advertisement