SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ज्येष्ठांच्या एसटी प्रवासावर असणार ‘अशी’ बंधने, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय..!

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’…एसटीचे ब्रिद वाक्य.. या लाल परीची चाके गाव-खेड्यात पोचली नि ग्रामीण भागातील लोकांची दळणवळणाची सोय झाली.. एसटीने समाजातील विविध घटकांसाठी सवलतीत प्रवासाची सोय केली.. अगदी लहानापासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांना एसटीच्या विविध योजनांचा लाभ मिळतो..

एसटी महामंडळाने यंदा अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. आपला 74 वा वर्धापन दिन साजरा करीत असतानाच, एसटीने ज्येष्ठ नागरिकांना मोठा धक्का दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासावर एसटीकडून मोठ्या प्रमाणात बंधनं घालण्यात आली आहेत.. त्यासाठी काही मर्यादा ठरवून दिली आहे..

Advertisement

एसटी महामंडळाकडून 65 वर्षांवरील ज्येष्ठांना प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात येते. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी फक्त आपले ओळखपत्र दाखवावे लागत होते. आता एसटीने सवलत धारकांसाठी ‘स्मार्टकार्ड’ योजना आणलीय.

ज्येष्ठांसाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक करण्यात आलं असून, हे कार्ड बनविण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिलीय. 1 जुलैपासून ‘स्मार्टकार्ड’ असणाऱ्या ज्येष्ठांनाच तिकिटात सवलत मिळणार आहे. तसेच, ‘स्मार्टकार्ड’ धारकांनाही आता काही मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ‘स्मार्टकार्ड’च्या सवलतीत आता फक्त 4 हजार किलोमीटरच प्रवास करता येणार आहे.

Advertisement

ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी अशी कोणतीही मर्यादा नव्हती. मात्र, एसटीनेने आपल्या 74 व्या वर्धापन दिनी ज्येष्ठांना ‘जोर का झटका’ दिला आहे. सवलतीत प्रवासासाठी वर्षाला 4 हजार किलोमीटरची मर्यादा घालून दिल्याने आता ज्येष्ठांचा प्रवासही मर्यादित होणार आहे. या निर्णयाबाबत ज्येष्ठांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे..

स्मार्टकार्डधारकांसाठी मर्यादा

Advertisement
  • 65 वर्षांवरील सर्व नागरिकांना सवलतीत एसटी प्रवासासाठी ‘स्मार्टकार्ड’ बंधनकारक असेल.
  • ज्येष्ठांच्या एसटी प्रवासादरम्यान वाहकाकडील ‘ईटीआय’ मशीनमध्ये प्रवासाची नोंदणी होईल.
  • ज्येष्ठ नागरिकाचा 4 हजार किलोमीटरचा प्रवास झाल्यावर तिकिटात सवलत मिळणार नाही.. त्यानंतर पूर्ण तिकिटाचे पैसे मोजावे लागतील.
  • एक वर्षानंतर स्मार्टकार्डचे नूतनीकरण करता येईल. नोंदणीसाठी 50 रुपये द्यावे लागतील.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 हजार किलोमीटरची मर्यादा आल्याने त्यांच्या प्रवासावर मोठ्या प्रमाणात बंधने येणार आहेत. प्रवासादरम्यानच नागरिकांना अंतरावरही लक्ष ठेवावे लागणार असल्याचे दिसते..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement