SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तळीरामांसाठी खुशखबर! आता देशी दारूचेही प्रकार मिळणार?

राज्य सरकारने तळीरामांसाठी खुशखबर आणली आहे. दारू नाव तसं वाईट पण काहींना आणि सरकारलाही ती अमृताहूनही जास्त गोडी देणारी असते. याची प्रचिती आपल्याला दारूपासून मिळणाऱ्या महसूलाच्या बातम्या पाहून गेल्या 2 वर्षांमध्ये आलीच असेल. राज्यात दारूपासून मिळणारा कर हा खूप जास्त असल्याने सरकारचं या गोष्टीकडे चांगलंच लक्ष असतं. आता सरकारने महसूल आणखी मिळण्यासाठी एक धोरण आखले आहे.

सामान्यतः आपल्याला माहीतच आहे की, देशी दारू खेड्यापाड्यांत व शहरांतही मिळत असते. देशी दारू पिणारे लोक लेझीम खेळण्याइतपत तोल जाईस्तोवर ती पितात. कुठे न कुठे ऐकलं असेल की, देशी दारू असते पण ती एकच प्रकारची असते, होय ती पूर्वी एकाच प्रकारात मिळायची. पण आता त्यामध्येही आणखी प्रकार मिळणार आहे, हे ऐकलं तर नवल वाटायला नको..!

Advertisement

तुम्हाला सांगू इच्छितो की, आता उत्पादन शुल्क विभागाने महसूलवाढीसाठी यामध्ये खास शक्कल लढवित देशी दारू चार प्रकारांत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे याअंतर्गत लवकरच रंगीत आणि रंगहीन अशी दारू बाजारात उपलब्ध होणार आहे. याबाबतची शासनाने अधिसूचनाही काढण्यात आली असल्याची माहीती आहे. त्यानुसार राज्य शासनाने याअंतर्गत लवकरच रंगीत आणि रंगहीन अशी दारू बाजारात उपलब्ध होणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत सांगण्यात आले आहे. (now the desi liquor will be available in four variants)

राज्य शासनाने महाराष्ट्र देशी नियम 1973मध्ये सुधारणा केली आहे, त्या सुधारित नियमांनुसार, ‘महाराष्ट्र देशी मद्य तिसरी सुधारणा नियम 2022’ असे संबोधण्यात येणार आहे. मद्यार्काच्या प्रकारानुसार महसूलही वसूल करण्यात येणार आहे. पहिल्या प्रकारात एका प्रुफ लिटरला 10 रुपये महसूल (उत्पादन शुल्क) आकारला जाऊ शकतो, दुसऱ्या प्रकारात 155 रुपये, तिसऱ्या प्रकारात 180 रुपये आणि चौथ्या प्रकारात 250 रुपये महसूल आकारला जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी एका प्रुफ लिटरला सरसकट 155 रुपये महसूल आकारला जात होता.

Advertisement

देशी दारू चार प्रकारांत..

मोहफुलांपासून व काजूबोंडेपासून प्राप्त मद्यार्क वापरून रंगीत पदार्थ न वापरून जर मद्य तयार केले असेल, तर हा एक प्रकार आहे. यात अल्कोहोलचे प्रमाण 42.8 टक्के आहे.

Advertisement

तर दुसऱ्या प्रकारात काजूबोंडे व मोहफुले नव्हे तर इतर पदार्थांपासून प्राप्त मद्यार्क वापरून कोणताही रंगीत पदार्थ न वापरून जर मद्य तयार केले असेल, तर हा दुसरा प्रकार आहे. यात 35.66 टक्के अल्कोहोल असेल.

त्याप्रमाणे काजूबोंडे व मोहफुलांव्यतिरिक्त इतर पदार्थांपासून मिळालेला मद्यार्क वापरून रंगीत पदार्थ न वापरून तयार केलेले मद्य असेल तर हा तिसरा प्रकार आहे. यात 42.8 टक्के अल्कोहोल आहे.

Advertisement

देशी दारूच्या चौथ्या प्रकारात धान्यधारित मद्यार्कामध्ये रंगीत पदार्थांचा वापर करण्यात येणार आहे. या मद्यात 42.8 टक्के अल्कोहोल असणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement