SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ड्रायव्हिंग लायसन्स’बाबत मोठा निर्णय, आता ‘अशी’ चालबाजी नाही चालणार…!

कोरोना संकटात सारं काही ठप्प झालं होतं.. नागरिकांना घराबाहेर पडण्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले होते.. त्यामुळे अनेक सरकारी कामांचाही खोळंबा होत होता.. त्यापैकीच एक म्हणजे वाहनचालक परवाना.. अर्थात ‘ड्रायव्हिंग लायसन्स’..!

कोरोना लाटेत नागरिकांवर बंधने असल्याने, त्यांच्या सोयीसाठी राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) एप्रिल 2021 पासून शिकाऊ वाहनचालक परवान्यासाठी (Learning Driving Licenses) घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देण्याची प्रक्रिया सुरू केली. नागरिकांना अगदी घरबसल्या परीक्षा देऊन ‘लर्निंग लायसन्स’ मिळू लागले.

Advertisement

घरबसल्या परीक्षा असल्याने त्यावर कोणाचेच नियंत्रण नव्हते. त्यामुळे परीक्षेत सावळा गोंधळ सुरु झाला.. अगदी दहावीच्या परीक्षेला ‘डमी’ उमेदवार बसतात, तसे कोणीही ‘लर्निंग लायसन्स’ची परीक्षा देत होतं.. एजंट लोकांनी तर त्यावर कडी केली. स्वत:च चाचणी देऊन उमेदवारांना परीक्षेतून सूट दिली.

काही एजंट लोकांनी तर ‘शिकाऊ वाहन परवाना घरबसल्या मिळवा..’ अशा जाहिरातीच काढल्या. त्यामुळे कोणलाही लायसन्स मिळू लागलं. चाचणी न देता ‘लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स’ अगदी व्हॉट्स अॅपवर मिळू लागलं.. त्यातून दलालांनी आपलं उखळ पांढरं करुन घेतलं..

Advertisement

शिकाऊ वाहनचालक परवाना हा उमेदवाराला वाहन चालविणं शिकण्यासाठी दिलेला असतो.. त्याचा कालावधी केवळ 6 महिन्यांचा असतो. या 6 महिन्यात वाहन चालवणं शिकून नंतर पक्के लायसन्स बनवावं लागतं. कोणालाही ‘लर्निंग लायसन्स’ मिळू लागल्याने चुकीच्या लोकांच्या हाती गाडीचे स्टेअरिंग गेल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते.

‘लर्निंग लायसन्स’च्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गडबड होत असल्याच्या तक्रारी अनेकांनी राज्य परिवहन विभागाकडे केल्या होत्या.. त्याची दखल घेऊन राज्य परिवहन विभागाने आता मोठा निर्णय घेतला आहे..

Advertisement

‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या परीक्षेसाठी आता ‘आर्टीफिशियल इंटेलिजन्स’ (Artificial Intelligence) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या परीक्षेला यापुढच्या काळात ‘डमी’ उमेदवार बसविणं शक्य होणार नाही. या ‘फेसलेस’ तंत्राचे उद्घाटन आज (गुरुवारी) राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाले..

आता ‘अशी’ होणार परीक्षा..
पूर्वी संगणकाचा ‘वेब कॅमेरा’ ऑन झाल्यावर उमेदवाराला हळूच बाजूला करुन दलाल लोकच स्वत: चाचणी देत. मात्र, आता स्क्रिनवर जरा हालचाल झाली, तरी चाचणीची ‘ऑनलाइन संगणकीय प्रक्रिया’ आपोआप बंद होणार आहे.

Advertisement

तसेच आधार कार्डवरील उमेदवाराचा फोटो ओळखूनच चाचणी सुरू होईल. त्यामुळे डमी उमेदवाराला चाचणीसाठी बसण्याची शक्यता नष्ट होईल. त्यासाठी ‘सारथी’ सॉफ्टवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, आजपासून ही प्रणाली लागू होणार असल्याचे सांगण्यात आले..

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement