SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

घडी घालता येणारी भन्नाट ‘ई-सायकल’ लाॅंच… एका चार्जिंगमध्ये पळणार ‘इतके’ किलोमीटर..

लक्झरीयस नि पॉवरफुल बाईकची निर्मिती करणारं एक मोठं नाव म्हणजे, ‘डुकाटी’ कंपनी.. आता या कंपनीने आपली पहिली ‘इलेक्ट्रिक सायकल’ बाजारात आणलीय. विशेष म्हणजे, कंपनीची ही सायकल ‘फोल्डेबल’ आहे. ‘डुकाटी एमजी-20 इलेक्ट्रिक फोल्डेबल सायकल’ (Ducati MG20) या नावानं ही ई-सायकल बाजारात सादर करण्यात आलीय.

‘डुकाटी’ कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक सायकल (Electric foldable cycle) आहे. खास बाब म्हणजे, तुम्ही या सायकलची सहज घडी करुन (फोल्ड) तिला कुठेही घेऊन जाऊ शकता.. शिवाय ही सायकल ‘फोल्ड’ होत असल्याने कमीत कमी जागेत ठेवू शकता.. ‘सिटी रायडिंग’साठी ही सायकल तयार केल्याचा दावा कंपनीने केलाय.

Advertisement

‘डुकाटी’ ई-सायकलची वैशिष्ट्ये

  • ही इलेक्ट्रिक सायकल एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही 50 किमी प्रवास सहज करू शकता. ही इलेक्ट्रिक सायकल हुबेहुब मोटारसायकलसारखीच तयार केलीय.
  • सायकलमध्ये मॅग्नेशियमपासून बनवलेली फ्रेम, फोर्क्स आणि रिम्स आहेत, त्यामुळे सायकल खूप हलकी झालीय. सायकलचे डिझाइन खूपच स्लीक असून, सायकल वापरण्यास सोपी आहे..
  • सायकलच्या हँडल बारमध्ये ‘वॉटरप्रूफ एलईडी पॅनेल’ बसवलंय. पावसात सायकल चालवली, तरी या पॅनेलचं काहीही नुकसान होणार नाही. पुढे एलईडी दिवा आणि चाकांवर परावर्तित पट्ट्या ऑप्टिमल व्हिजेबिलिटी आहे.
  • एलईडी पॅनेलमुळे सायकल कंट्रोल करण्यासाठी रायडरला अनेक सुविधा मिळतात. त्यात 36C 10.5Ah 378Wh सॅमसंग बॅटरी पॅक असेल..
  • सायकलच्या मागच्या चाकांना पॉवर देण्यासाठी 250W इलेक्ट्रिक मोटर असेल. ही मोटर रायडरला पेडल मारण्यास मदत करते. तसेच 20 इंचांची चाकं असतील.

किंमत किती?
‘डुकाटी एमजी-20’ या इलेक्ट्रिक फोल्डेबल सायकलची किंमत 1663 डॉलर, म्हणजेच सुमारे 1.29 लाख रुपये आहे. मात्र, भारतात या ई-सायकलची किंमत व उपलब्धतेबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement