‘व्हॉईस ऑफ लव्ह’ म्हणून ओळखला जाणारे सुप्रसिद्ध गायक केके यांच्या दुःखद निधनानंतर अभिनेता इमरान हाश्मी सध्या ट्विटरवर ट्रेंड होत आहे. प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’ यांचं मंगळवारी रात्री कोलकात्यामध्ये लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान तब्येत बिघडल्याने हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं असल्याची बातमी वाऱ्यासारखी देशात पसरली. आता केके’यांच्या मृत्यूमुळे चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.
केके यांच्या मृत्युच्या अंदाजे तासाभरापूर्वीच कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर गाणारे केके क्षणात सोडून गेल्याच्या गोष्टीवर चाहत्यांचा विश्वासदेखील बसत नाहीये. केके’चं मंगळवारी रात्री कोलकाता येथे आकस्मिक निधन झाल्यानंतर कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. हे सर्व आटोपल्यावर जेव्हा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आला तेव्हा त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असला तरी त्यांच्या यकृत आणि फुफ्फुसांची स्थिती फारशी चांगली नव्हती, असं समजलं आहे.
केके चा आवाज आणि इमरान हाश्मी अभिनित अनेक चित्रपटांना केकेच्या गाण्यांनी अधिक प्रसिद्धी मिळवून दिली. कारण केके यांनी सर्वाधिक गाणी इमरान हाश्मीच्या चित्रपटांसाठी गायली होती. इमरान आणि केके यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. केके यांच्या निधनाने इमरान हाश्मीला मोठा धक्का बसला आहे.
केके (KK) यांच्या निधनानंतर त्याने ट्वीटरवर केके यांचा एक फोटो शेअर करत म्हटलं की, “एक असा आवाज, एक असं टॅलेंट, अशी जादू जी दुसरं कोणीच दाखवू शकत नाही. आता त्याच्यासारखी गाणी गायलीही जात नाहीत. केके यांनी जी गाणी गायली त्यावर काम करणं माझ्यासाठी नेहमीच खास होतं. त्याच्यासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. केके तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात राहाल. तुमच्या गाण्यातून तुम्ही नेहमीच श्रोत्यांमध्ये जिवंत राहाल.”, असं इमरान हाश्मी म्हणाला.
केकेने इमरान हाश्मीसाठी (Imran Hashmi & KK Songs) अनेक रोमँटिक गाणी गायली आहेत. त्या प्रत्येक गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. याशिवाय दिल इबादत, जरा सा, तू ही मेरी शब है, बिते लम्हे, सोनिये यांसारखी कित्येक हिंदी रोमँटिक गाणी केकेने इमरान हाश्मीसाठी गायली आहेत. यामुळे चाहते देखील इमरान हाश्मीची गाणी जी केके यांनी गायली आहेत त्याचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. यामुळे इमरान हाश्मीची गाणी व केके यांचा आवाज असलेली गाणी केके यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चाहते पोस्ट करत आहेत. यामुळे इमरान हाश्मी सध्या ट्विटरवर ट्रेंड करत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy