मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डीझेल, किराणा, खाद्यतेल, एलपीजी, सीएनजी, प्रवासखर्च आणि दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या बहुतांश वस्तू महाग होत चालल्या आहेत. लागणाऱ्या वस्तुंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याचा फटका बसल्याने सर्वसामान्य लोकांच्या खिशाचा भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात (Repo Rate) वाढ केली आणि त्यानंतर जवळपास सर्वच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या कर्जाचे व्याजदर (Loan Interest Rates) वाढवले आहेत.
काही बँकांनी तर गेल्या महिन्याभरत 2-2 वेळा व्याजदरात वाढ केली आहे. 2 दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स म्हणून ओळख असलेल्या एचडीएफसी बँक तसेच पंजाब नॅशनल बँकेने आपल्या कर्जदारांना मोठा झटका दिला आणि या दोन्ही बँकांनी होम लोनच्या कर्जदरात वाढ केली. आता त्यानंतर बँक ऑफ इंडिया (Bank Of India) आणि ICICI बँकेनेही लोनसाठी MCLR वाढवला आहे.
बँक ऑफ इंडियानेही (Bank Of India) MCLR वाढवला आहे. नवीन दरांनुसार ओव्हरनाइट कर्जासाठी आता व्याजदर 6.70% असेल. तर एका महिन्याच्या कर्जासाठी 7.05%, तीन महिन्यांसाठी 7.10%, सहा महिन्यांसाठी 7.20% आणि एका वर्षासाठी 7.35% आणि 3 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या कर्जासाठी 7.70% व्याजदर (Interest Rate) असेल.
ICICI बँकेनेही लोनसाठी MCLR वाढवला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, आता ओव्हरनाइट लोनसाठी नवीन व्याजदर 7.30% असेल. तर एका महिन्याच्या कर्जासाठी 7.30%, तीन महिन्यांसाठी 7.35%, सहा महिन्यांसाठी 7.50% आणि एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीच्या कर्जासाठी 7.55% असेल.