SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ विमा योजनांचे प्रीमियम ‘एवढ्या’ रुपयांनी वाढले, नवीन दरवाढ आजपासून लागू..

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजनांर्फत नागरिकांना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य आणि गरीब नागरीकांना विविध सुविधा देत लाभ देण्याचा खेड्यापाड्यापर्यंत प्रयत्न करते. आता अशाच एका फायद्याच्या योजनेअंतर्गत महत्वाची बातमी समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या महत्वाच्या विमा योजनांच्या प्रीमियममध्ये वाढ झाली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या विमा योजनांचा प्रीमियम आता ग्राहकांना जास्त भरावा लागणार आहे. असे असले तरी ही गोष्ट सामन्यांना परवडणारी आहे.

Advertisement

प्राप्त माहीतीनुसार, आता PMJJBY विमा योजनेचा प्रीमियम दर दिवसाला सांगायचं झालं तर 1.25 रुपये एवढा खर्च लागणार आहे. यानुसार यापूर्वी वर्षाला 330 रुपये देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला आता यापुढे 436 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागणार आहे. तसेच PMSBY विमा योजनेसाठी वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये झाला आहे. या दोन्ही विमा योजनांतर्गत नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू होणार आहेत. याप्रमाणे PMJJBY चा प्रीमियम 32 टक्के आणि PMSBY 67 टक्क्यांनी वाढला आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY): देशातील 18-50 वर्षे वयोगटातील नागरिकांना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अकाऊंट असलेल्यांना कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे जीवन विमा संरक्षण प्रदान करते.

Advertisement

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY): देशातील जे नागरिक या विमा योजनेचा लाभ घेत असतील त्यांचा अपघाती मृत्यू झाला किंवा त्यांनतर त्यांना कायमचे अपंगत्व आले तर रु. 2 लाख आणि 18-70 वयोगटातील लोकांना अंशतः कायमचे अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement