मुंबई :
दहावी आणि बारावीचा बोर्डाचा निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थी पालकांचं लक्ष लागलेलं आहे. परीक्षा झाल्यानंतर निकालाची उत्सुकता लागलेल्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. बारावीचा निकाल 6 किंवा 7 जूनला लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागेल, अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटले होते की, 10 जून रोजी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. तर दहावीचा निकाल हा 20 जून रोजी लागू शकतो.
मात्र आता शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाविषयी बोलताना सांगितले की, पुढच्या आठवड्यात 12 वीचा निकाल लागेल. दहावीचा निकाल हा जूनच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला लागू शकेल. हा निकाल 6 किंवा 7 जूनला लागू शकेल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावीचा निकाल लागणार.
4 मार्चपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यात 14 लाख 85 हजार 826 इतके विद्यार्थी बसले होते तर दहावीच्या बोर्ड परीक्षेला 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी सामोरे गेले होते. आता पेपर तपासणी पूर्ण झाली असून मूल्यांकन प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे लवकरच बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत.