आज 1 जून 2022. आज नीट लक्ष दिलं तर तुमचे आजोबा, आजी, मावशी, आजूबाजूचे, ओळखीपाळखीचे यांच्यापैकी कोणाचा ना कोणाचा वाढदिवस 1 जूनला हा असतोच. जर तुमचे वय 25 च्या पुढे असेल तर कदाचित तुमच्या आई-वडिलांपैकी सुद्धा एखाद्याचा वाढदिवस आज असू शकतो. तसचे प्रत्येकाच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर 1 जून रोजी वाढदिवस असलेली शेकडोंची फ्रेंडलिस्ट आहे. मात्र, तुम्हला माहित आहे का, बहुतांश लोकांचा जन्मदिवस 1 जून का असतो?
1979 च्या आधी जन्म झालेल्या जुन्या पिढीतील अनेक लोकांना आपली जन्मतारीख माहित नव्हती. शिवाय जन्मतारखेला फारसं महत्त्व देखील दिले जात नव्हते. इतकंच काय तर शाळेत नाव नोंदवताना जन्मतारखेची फारशी आवश्यकता नव्हती. मात्र शाळेत घालण्यासाठी वयाची अट होती ही अट पूर्ण करण्याचा कालावधी जूनपासून मोजला जात असे.
त्यामुळे सोयीचे म्हणून बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांची जन्मतारीख 1 जून नोंदवत असत. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील शाळा या 1 जूनला उघडत त्या दिवशी जेवढी मुले शाळेत येत, तेवढ्या मुलांचा जन्मदिवस शिक्षक मंडळी 1 जून नोंदवत. जी मुले 2 तारखेला शाळेला हजर व्हायची त्यांचा जन्मदिवस 2 जून असा नोंदवला जायचा. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असते. पण या जन्मतारखेमुळे आज एकाच दिवशी अनेकांचे वाढदिवस साजरे होतात हे नक्कीच…
आजच्या 1 जून रोजी शैक्षणिक किंवा खरा वाढदिवस असलेल्या शेकडो फ्रेंडसना ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’