आपल्या आवाजाच्या मधुरतेने मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (केके) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. केके यांचं 53 वर्षे वय होतं. त्यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. गायक केके (Krishnakumar Kunnath Death) यांचा कोलकाता येथील नझरुल मंच येथे लाईव्ह कॉन्सर्ट सुरू होता. त्यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहीती आहे.
कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्टच्या कार्यक्रमादरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात नेल्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी ते मृत झाले असल्याचं सांगितलं. तसेच, त्यांच्या शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण अधिकृतपणे स्पष्ट होणार आहे.
केके यांचा गोड आवाज प्रेक्षकांना अत्यंत आवडायचा. याच शैलीमुळे त्यांचे गाणे ऐकणारा एक वेगळा चाहता वर्ग बनला गेला आहे. गायक केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून एकेक दिग्गज गेल्यानंतर त्यामागून केके हे देखील आज आपल्यात राहिले नाहीयेत. अनेकांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.
मराठी, हिंदीसह नऊ भाषांतील गाणी त्यांनी गायिली आहेत. हिंदीतील ‘तडप तडप के’, ‘दस बहाने’, ‘खुदा जाने’, ‘जिंदगी दो पल की’, ‘आँखो में तेरी अजब सी’, जन्नत सिनेमातील गाणी, तू ही मेरी शब हैं, लबो को लबो पे सजा दो, सजदे की ये हैं लाखों अशी एकापेक्षा एक जबरदस्त गाणी त्यांनी आज चाहत्यांना दिली आहेत.
बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या आवाज हा खास म्हणूनच राहिला आहे. केके ‘पल’ आणि ‘यारों’ सारख्या गाण्यांसाठी ओळखले जात, जे 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात किशोरवयीन मुलांमध्ये खूप हिट झाले. अनेक नवनवीन गायक येत असताना आजही केके यांचा दबदबा कायम आहे हे नक्कीच दिसतं.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy