SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता ‘हे’ मेसेज एडिट करता येणार, व्हॉट्सअ‍ॅप आणणार जबरदस्त फिचर..

आपण कित्येक जण व्हॉट्सअ‍ॅप वापरत असू. जगातील असंख्य लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरत असतात. त्यांना काही महत्वाचे फीचर्स व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच पुरवत असते. आता सध्या कंपनी मागच्या काही दिवसांपासून एका मस्त फीचरवर काम करताना दिसत आहे. माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एडिट बटण हे फीचर आता लवकरच येणार येणार असल्याची माहिती आहे.

WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार..

Advertisement

व्हॉट्सअ‍ॅप सध्या यूजर्सचा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्याचा अनुभव आणखी सोयीचा आणि छान होण्यासाठी कंपनी एडिट बटणाची टेस्टिंग करत आहे. आताच्या घडीला व्हॉट्सअ‍ॅपवर आपण मेसेज पाठवला की त्याला दुरुस्त करण्यासाठी कोणतेही एडिट बटण नाही. आपणच काय बहुतेक लोक व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करताना चुकतात तेव्हा ते त्याच मेसेजला रिप्लाय देऊन तो मेसेज असा-असा आहे म्हणून पुन्हा सांगतात. यामध्ये वेळेचा अपव्यव होतो ही बाब देखील तितकीच खरी. आता यावर कंपनीने तोडगा काढला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपने या समस्येवर उपाय शोधत एक असे फिचर काढले आहे ज्यामुळे Whatsapp Users ने सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले चुकीचे मेसेज डिलीट करण्याची गरज नाही. कारण ते मेसेज आता एडिट केले जाऊ शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचरमुळे यूजर्स मेसेज पाठवल्यानंतर मेसेज एडिट करू शकतील याचा अर्थ ते मेसेज पुन्हा त्यातील चूक दुरुस्त करून किंवा काही कमी-जास्त मेसेज असला तर आपल्याला वाटेल तेवढा तो ठेवता येणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने काही दिवसांपूर्वी मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर नव्या अपडेट मध्ये दिलं आहे.

Advertisement

आता व्हॉट्सअ‍ॅप टेक्स्ट मेसेज एडिटिंग फीचर देत आहे, जे आगामी अपडेटसह सादर केले जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, त्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप एक नवीन पर्याय आणत आहे, ज्यामुळे एखादा मेसेज तुम्हाला एडिट करून बदल करता येईल. याच्या मदतीने युजर्स मेसेज पाठवल्यानंतरही मेसेजमध्ये काही कमतरता आढळली किंवा चूक वाटली की ती ठीक करून, सुधारून तो मेसेज पुहा पाठवता येणार आहे.

व्हॉट्सअ‍ॅपकडून हे फीचर सध्या विकसित करण्याचं काम चालू आहे. यामध्ये येत्या काळात काही बदल देखील होऊ शकतात. याचबरोबर, व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर सर्व अँड्रॉइड बीटा, आयओएस बीटा आणि डेस्कटॉपसाठी काम करत असल्याचं समजत आहे. हे लवकरच व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सना नव्या अपडेटमध्ये वापरायला मिळू शकत, पण कधी याचं उत्तर अद्याप देता येणार नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement