SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीचे भाव घसरले; वाचा, ताजे भाव सिंगल क्लिकवर

मुंबई :

लग्नसराईचे दिवस असतानाही सोने व चांदीचे दर खाली-वर होत आहेत. मागील 2 आठवड्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. आता मात्र सोन्याच्या दरात पुन्हा घसरण होऊ लागली आहे. जागतिक बाजारातील घसरणीनंतर आज देशांतर्गत बाजारातही सोन्या-चांदीचे भाव खाली आले आहेत.

Advertisement

गेल्या काही दिवसात वाढलेले सोन्याचे दर पुन्हा एकदा 50 हजारांच्या जवळ येताना दिसत आहे. चांदीची किंमतही 61 हजारांच्या खाली येताना दिसत आहे. MCX वर बुधवारी सकाळी सोन्याचा भाव 375 रुपयांनी घसरून 50,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. सकाळी ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे त्यामध्ये लवकरच 0.74 टक्क्यांनी घसरण झाली. सकाळी MCX वर चांदीचा भाव 512 रुपयांनी घसरून 60,613 रुपये प्रति किलोवर आला. सकाळी ट्रेडिंग ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर कमी मागणीमुळे त्याच्या किंमती 0.84 टक्क्यांनी घसरल्या.

पुणे :- 22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये/ 24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,870 रुपये

Advertisement

मुंबई :- 22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,500 रुपये/ 24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,820 रुपये

नागपूर :- 22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,550 रुपये/ 24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,870 रुपये

Advertisement