SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्वस्तात मस्त! 8 हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ मोबाईल्स..

आजच्या दुनियेत प्रत्येकाला वाटतं की, आपल्याकडे स्मार्टफोन असायला हवा. पण बजेटवर सगळं काही अवलंबून असल्याने आपण पैशांचा विचार करूनच निर्णय घेतो. म्हणून आज तुम्हाला आम्ही असे काही स्मार्टफोन्सचे पर्याय उपलब्ध करून देणार आहोत, ज्यामुळे तुम्ही फक्त 8000 रूपयांपेक्षा कमी किंमतीत नवीन स्मार्टफोन अर्थातच मोबाईल घेऊ शकणार आहात. यासाठी तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्टवर ऑफर्स चेक करून स्मार्टफोन घेऊ शकता म्हणजे तुम्हाला स्मार्टफोन आणखी स्वस्तात (Smartphone under 8,000 rs.) मिळतील.

जर तुम्हालाही वाटत असेल की, ‘8 हजार रुपयांच्या जवळपास बजेट गेलं तरी चालेल पण आपण स्मार्टफोन घ्यायचाच’, तर खाली काही कमी रेंजमध्ये दिलेल्या स्मार्टफोनमध्ये जास्त पॉवरची बॅटरी आणि बेस्ट डिस्प्ले साईजसह येत आहे. याशिवाय जबरदस्त कॅमेरे असलेले Samsung, Realme, Redmi सारख्या काही सुप्रसिद्ध कंपन्यांचे स्मार्टफोन 8,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतात. तर वाचा टॉप 5 ब्रँडेड स्मार्टफोन्सबद्दल..

Advertisement

Samsung Galaxy M02: Samsung Galaxy M02 चे 3 GB RAM आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंट 7,999 रुपयांना विकत घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 2 जीबी रॅम असणारे व्हेरिएंट मिळेल. स्मार्टफोनमध्ये याशिवाय 6.5 इंच डिस्प्ले, MediaTek MT6739W प्रोसेसर, 13 मेगापिक्सेल प्रायमरी रिअर कॅमेरासह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर, 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी जास्त क्षमतेची म्हणजेच 5000mAh बॅटरी दिली जाईल. सॅमसंगचा हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू, ग्रे आणि रेड रंगात मिळू शकतो.

Infinix Smart 5: Infinix Smart 5 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा आकर्षक डिस्प्ले, 6000mAh ची जम्बो बॅटरी, हँडसेटच्या मागील बाजूला 13-मेगापिक्सेल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, पुढील बाजूस 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. Infinix चा हा फोन Android 10 वर बेस्ड XOS 7 स्क्रिनसह येतो. Infinix च्या Smart 5 मध्ये 2GB RAM सोबतच MediaTek Helio G25 ऑक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.

Advertisement

Realme Narzo 50i: Realme Narzo 50i स्मार्टफोन 2 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज किंवा 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेज अशा पर्यायात देखील घेऊ शकता. मायक्रोएसडी कार्डचा वापर करून एक्सटर्नल स्टोरेज 256 GB पर्यंत तुम्ही वाढवू शकता. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा IPS-LCD पॅनल दिला जाणार आहे. हँडसेटमध्ये 8 मेगापिक्सेल प्रायमरी आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 11 आधारित Realme Go UI सोबत मिळतोय. हँडसेटला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Xiaomi Redmi 9A: Xiaomi Redmi 9A स्मार्टफोन घ्यायचा असेल तर त्यास 6.53 इंच मोठी स्क्रीन आणि 5000mAh बॅटरी मिळणार आहे. Android 12 सह MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमसह तसेच 2 GHz ऑक्टा-कोर MediaTek Helio G25 प्रोसेसर, 2 GB रॅम आणि 32 GB इनबिल्ट स्टोरेज किंवा 3 GB किंवा 4 GB रॅम पर्यायासह उपलब्ध आहे. Redmi 9A मध्ये 13 MP चा रियर कॅमेरा, 5 MP चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. micro SD कार्डद्वारे एक्सटर्नल स्टोरेज तुम्ही 512 जीबी पर्यंत वाढवू शकता. हा स्मार्टफोन कार्बन ग्रे, स्काय ब्लू आणि ओशन ग्रीन रंगात मिळेल.

Advertisement

Tecno Spark 7T: भारतीय कंपनी Tecno चा Spark 7T हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB इनबिल्ट स्टोरेजसह आहे. फोनमध्ये 6.52 इंच एचडी+डॉट नॉच IPS Display मिळणार आहे. स्क्रीनचा Aspect Ratio 20:9 असून फोनमध्ये Octa Core MediaTek Helio G35 प्रोसेसर आहे. टेक्नोच्या या फोनमध्ये मागच्या बाजूला 48 MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh भली-मोठी बॅटरीसुद्धा दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement