SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘ही’ कार घेणं खिशाला परवडणार, पेट्रोलसह सीएनजीदेखील भरता येणार..

देशात इंधनाची दरवाढ आणि खिशाला परवडणारी कार हे समीकरण आता लवकरच जुळणार आहे, असं दिसत आहे. कारण दिग्गज कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी लवकरच भारतात आपली इको व्हॅन किंवा MPV लाँच करण्याच्या तयारीत आहे.

एका अहवालानुसार, मारुती सुझुकी कंपनी ईकोचे (Maruti Suzuki Eeco) नेक्स्ट-जनरेशन मॉडेल तयार करत आहे. अशी माहीती आहे की, दिवाळीपूर्वी Maruti Suzuki Eeco कार लाँच केली जाण्याची शक्यता आहे. फॅमिलीसाठी आणि प्रवासी वाहतुकीसाठी असा दुहेरी वापर होत असलेल्या मारुती सुझुकी इकोने 10 वर्षांहून अधिक काळ देशांतर्गत बाजारात स्थान पक्के धरून ठेवले आहे.
आता कंपनी नवीन काही आकर्षक गोष्टींसह, फिचरसह या जबरदस्त कारला येत्या काही महिन्यात लॉंच करेल, अशी माहीती आहे.

Advertisement

प्राप्त माहीतीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 1 लाख 8 हजारांहून जास्त कार विकल्या गेलेल्या MPV श्रेणीतील मारुतीचे इको हे सर्वाधिक विकले जाणारे प्रवासी वाहन ठरले. इको कारला मारुती सुझुकी कंपनीने वर्ष 2010 मध्ये सादर केले होते. ही कार 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही व्हेरिएंट मध्ये येते. कारची किंमत एक्स-शोरूम 4.08 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.29 लाख रुपयांपर्यंत जाते.

आता तुम्हाला पॉवरट्रेनबद्दल सांगायचं झालं, तर ही कार दोन प्रकारच्या इंजिन पर्यायात म्हणजेच पेट्रोल आणि सीएनजी (CNG) सोबत येऊ शकते. 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पहिल्या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. सीएनजी किट असलेले हे इंजिन 63Ps पॉवर आणि 85Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या मते, या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 16.1 केएमपीएल मायलेज देते आणि सीएनजी व्हेरिएंट 20.88 केएम/केजी मायलेज देते, असं समजतंय.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement